Makhana Cutlet Recipe : नाश्त्यासाठी बनवा टेस्टी आणि हेल्दी 'मखाना कटलेट', वाचा ही सोपी रेसिपी

हेल्दी ब्रेकफास्ट करायचा असेल तर घरीच बनवा मखाना कटलेट
Makhana Cutlet
Makhana Cutlet sakal
Updated on

नाश्ता हा आपल्या आयुष्याचा एक महत्त्वपूर्ण आहार आहे, जो योग्य प्रकारे केला नाही तर संपूर्ण दिवस खराब जाऊ शकतो. जर तुम्हाला कटलेट्स खायला आवडत असेल तर यावेळी बटाटा कटलेटपेक्षा काहीतरी वेगळे बनवा. जर तुम्ही याआधी कोणतेही वेगळे कटलेट ट्राय केले नसेल तर आज आम्ही तुम्हाला अशी कटलेटची रेसिपी सांगणार आहोत जी चवदार आणि आरोग्यदायी देखील आहे.

मखनाचे फायदे आपल्या सर्वांना माहीत आहेतच. मखाना तुमचे वजन कमी करण्यापासून ते तुमचे कोलेस्ट्रॉल लेव्हल राखण्यापर्यंत अनेक गोष्टींमध्ये मदत करते. चला तर मग पटकन सांगतो मखाना कटलेटची रेसिपी.

लागणारे साहित्य

मखाना (1 कप) बटाटे (4 उकडलेले) हिरव्या मिरच्या (2 बारीक चिरलेल्या) शेंगदाणे (2 चमचे भाजलेले) बडीशेप (1 टीस्पून) कोथिंबीर (बारीक चिरलेली) चाट मसाला (1 टीस्पून) गरम मसाला पावडर (1 टीस्पून) लाल मिरची पावडर (1/4 टीस्पून) काळे मीठ (2 टीस्पून) तूप (4 टीस्पून) तेल (1/2 कप)

Makhana Cutlet
Pizza Sandwich Recipe : नाश्त्यासाठी बनवा टेस्टी पिझ्झा सँडविच, जाणून घ्या सोपी रेसिपी

मखाना कटलेट कसा बनवायचा

मखाना कटलेट्स बनवण्यासाठी प्रथम मखाना तुपात तळून घ्या आणि थंड होऊ द्या. थंड झाल्यावर बारीक करून घ्या. मखाना मॅश केलेल्या बटाट्यामध्ये मिक्स करा. त्यात हिरवी मिरची, बडीशेप, शेंगदाणे, कोथिंबीर, चाट मसाला, गरम मसाला, काळे मीठ टाका. आता ते चांगले मिसळा.

आता या मिश्रणाचे छोटे गोळे घ्या आणि त्यांना कटलेटचा आकार द्या. आता गॅसवर कढई ठेवा आणि त्यात तूप किंवा तेल गरम करा. त्यात तयार कटलेट गोल्डन होईपर्यंत तळा. तयार कटलेट गरम सॉस किंवा तुमच्या आवडत्या चटणीसोबत सर्व्ह करा.

Related Stories

No stories found.