सध्या लॉंग विकेंड सुरु असून मुले घरी आईला वेगवेगळे पदार्थ बनवून दे असा हट्ट करतात. अशा वेळी मुलांसाठी सरळ सोप्या पद्धीतीनं काय बनवावं असा प्रश्न पडतो. मात्र आता चिंता करू नका. आज आम्ही तुमच्यासाठी सोपी रेसिपी घेऊन आलो आहोत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही रेसिपी कोणती आहे? तर आम्ही तुम्हाला सांगतो की ही रेसिपी 'मखाना कटलेट' आहे
मखाना (1 कप) बटाटे (4 उकडलेले) हिरव्या मिरच्या (2 बारीक चिरलेल्या) शेंगदाणे (2 चमचे भाजलेले) बडीशेप (1 टीस्पून) कोथिंबीर (बारीक चिरलेली) चाट मसाला (1 टीस्पून) गरम मसाला पावडर (1/2 1 टीस्पून) लाल मिरची पावडर (1/4 टीस्पून) काळे मीठ (2 टीस्पून) तूप (4 टीस्पून) तेल (1/2 कप)
मखाना कटलेट्स बनवण्यासाठी प्रथम मखाना तुपात भाजून घ्या आणि थंड होऊ द्या. थंड झाल्यावर बारीक वाटून घ्या. आता ते उकडलेल्या बटाट्यामध्ये मॅश करा. त्यात हिरवी मिरची, बडीशेप, शेंगदाणे, कोथिंबीर, चाट मसाला, तिखट, गरम मसाला, काळे मीठ टाका. आता ते चांगले मिसळा.
आता या मिश्रणाचे छोटे गोळे घ्या आणि त्यांना कटलेटचा आकार द्या. आता गॅसवर पॅन ठेवा आणि त्यात तूप किंवा तेल गरम करा. त्यात तयार कटलेट गोल्डन होईपर्यंत फ्राय करा. तयार कटलेट गरम सॉस किंवा तुमच्या आवडत्या चटणीसोबत सर्व्ह करा.