Broccoli Omelette Recipe : ब्रोकोली ऑम्लेट खाऊन दिवसाची सुरुवात करा, ही आहे सोपी रेसिपी

आम्ही तुम्हाला ब्रोकोली ऑम्लेटची स्वादिष्ट आणि आरोग्यदायी रेसिपी सांगणार आहोत, जी काही मिनिटांत तयार होईल.
Broccoli Omelette Recipe
Broccoli Omelette Recipe sakal
Updated on

फायबर, कॅल्शियम, लोह, प्रथिने, सेलेनियम, व्हिटॅमिन ए आणि सी यांसारख्या अनेक पोषक तत्वांनी समृद्ध ब्रोकोली आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. नाश्त्यात ऑम्लेट खायला अनेकांना आवडते, पण तेच ऑम्लेट पुन्हा पुन्हा खाण्याचा तुम्हाला कंटाळा येत असेल, तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. येथे आम्ही तुम्हाला ब्रोकोली ऑम्लेटची स्वादिष्ट आणि आरोग्यदायी रेसिपी सांगणार आहोत, जी काही मिनिटांत तयार होईल.

ब्रोकोली ऑम्लेट बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • एग व्हाइट - 2

  • एग यॉक - 1

  • स्प्रिंग ओनियन- 1 टेबलस्पून (बारीक चिरलेला)

  • ब्रोकोली- 1/2 कप (लहान तुकडे करा)

  • दूध - 1 टीस्पून

  • तूप - 1 टीस्पून

  • ओरेगॅनो - 1/2 टीस्पून

  • चिली फ्लेक्स- 1/2 टीस्पून

  • मीठ - चवीनुसार

Broccoli Omelette Recipe
Corn Appe Recipe: नाश्त्यासाठी बनवा टेस्टी 'कॉर्न आप्पे', ही आहे सोपी रेसिपी..

ब्रोकोली ऑम्लेट कसा बनवायचा?

ब्रोकोली ऑम्लेट बनवण्यासाठी प्रथम एका नॉन-स्टिक पॅनमध्ये तेल गरम करा.

नंतर कांदा, काळी मिरी आणि ब्रोकोली टाका.

यानंतर त्यात ओरेगॅनो, चिली फ्लेक्स आणि चवीनुसार मीठ घाला.

नंतर एका बाऊलमध्ये अंड्याचा पांढरा भाग, चिमूटभर मीठ आणि 1 चमचे दूध घाला.

यानंतर, ते चांगले फेटून घ्या.

नंतर हे फेटलेले अंडे पॅनमधील भाज्यांवर टाका.

यानंतर, दोन्ही बाजूंनी चांगले भाजून घ्या.

तुमचा टेस्टी ब्रोकोली ऑम्लेट तयार आहे.

Chitra kode:

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com