Cheese Garlic Bread Recipe : नाश्त्यासाठी घरीच बनवा टेस्टी चीज गार्लिक ब्रेड, ही आहे सोपी रेसिपी

Cheese Garlic Bread for Breakfast : आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही गार्लिक ब्रेड कमी वेळात घरी कसा बनवू शकता.
Cheese Garlic Bread
Cheese Garlic Breadsakal
Updated on

आत्तापर्यंत तुम्ही बाजारात मिळणारे गार्लिक ब्रेडच खाल्ले असेल. लोक क्वचितच घरी बनवतात. पण, तुम्ही क्रिस्पी चीज गार्लिक ब्रेड अगदी सहज घरी बनवू शकता. विशेष म्हणजे ते बनवण्यासाठी तुम्हाला जास्त साहित्य आणि वेळ लागणार नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही गार्लिक ब्रेड कमी वेळात घरी कसा बनवू शकता. विशेष म्हणजे ते बनवण्यासाठी तुम्हाला मायक्रोवेव्हचीही गरज नाही. तुम्ही ते घरी सहज तयार करू शकता. चला तुम्हाला चीज गार्लिक ब्रेड बनवण्याची सोपी रेसिपी सांगतो.

चीज गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी लागणारे साहित्य

- ब्रेड

- चीज

- सॉल्ट बटर - 150 ग्रॅम

- लसूण - 2 चमचे

- ओरेगॅनो - 1 टीस्पून

- चिली फ्लेक्स - 1 टीस्पून

- मीठ - आवश्यकतेनुसार

Cheese Garlic Bread
Oats Mini Uttapam Recipe : दिवसाची सुरुवात करा टेस्टी आणि हेल्दी; नाश्त्यासाठी बनवा ओट्सचा मिनी उत्तप्पम

चीज गार्लिक ब्रेड रेसिपी

सर्व प्रथम एका भांड्यात बटर काढा. त्यात ओरेगॅनो, किसलेला लसूण आणि चिली फ्लेक्स मिक्स करा. तुम्ही त्यात चिमूटभर मीठ घालू शकता. आता गॅसवर तवा ठेवा. ब्रेडचे दोन स्लाईस घ्या आणि तयार केलेले बटर प्रत्येक स्लाईसला नीट लावा. आता दोन ब्रेड स्लाइसमध्ये चीज स्लाइस ठेवा आणि मंद आचेवर बेक करा.

थोडावेळ झाकून ठेवा. ब्रेड दोन्ही बाजूंनी गोल्डन होईपर्यंत बेक करा आणि चीज मेल्ट झाले आहे का हे चेक करा. तयार गार्लिक ब्रेड काढा आणि सॉस, चटणी किंवा तुमच्या आवडत्या डिपसोबत मुलांना, पाहुण्यांना आणि तुम्हालाही सर्व्ह करा.

Chitra kode:

Related Stories

No stories found.