Christmas 2023 : अवघ्या काही दिवसांवर ख्रिसमस येऊन ठेपला आहे. सर्वत्र ख्रिसमसची जोरदार तयारी सुरू आहे. ख्रिसमस ट्री, सजावटीच्या गोष्टी, विविध प्रकारचे केक्स आणि खाद्यपदार्थ इत्यादी गोष्टींची नुसती रेलचेल पहायला मिळत आहे.
या सर्व गोष्टी खरेदी करण्यासाठी नागरिकांची देखील गर्दी होताना दिसत आहे. ख्रिसमसला विविध प्रकारचे केक्स हमखास बनवले जातात. लहान मुलांना विशेष आवडणारा चोको लावा केक देखील या दिवसांमध्ये आवर्जून बनवला जातो.
आज आम्ही तुम्हाला खास ख्रिसमससाठी घरच्या घरी बनवता येणाऱ्या चोको लावा केकची रेसिपी सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात चोको लावा केकची रेसिपी.
डार्क चॉकलेट – १ कप
मैदा – अर्धा कप
४ अंडी
बटर अर्धी वाटी
आयसिंग शुगर १०० ग्रॅम
सर्वात आधी चॉकलेट आणि बटर वेगवेगळ्या भांड्यात काढून ते वितळून घ्या.
त्यानंतर, हे दोन्ही घटक वितळले की, दोन्ही वेगळ्या भांड्यात काढून घ्या.
आता १ भांडे घ्या, त्यामध्ये २ अंडी फोडून घ्या. अंड्यातील फक्त पिवळा भाग घ्या.
आता ही दोन्ही अंडी चांगली फेटून घ्या.
आता या फेटलेल्या अंड्यांमध्ये पिठीसाखर घाला.
आता वितळलेले चॉकलेट आणि बटर मिक्सरमध्ये बारीक करा. जेणेकरून ते एकत्रितपणे चांगले मिक्स होऊ शकेल.
आता या मिश्रणात राहिलेल्या २ अंड्यांचा पिवळा भाग टाका आणि मैदा ही घाला. आता पुन्हा हे सर्व मिक्सरला बारीक करा.
जेणेकरून ते चांगल्या प्रकारे एकत्र होईल. जेणेकरून यात गुठळ्या राहू नयेत.
आता केकचे भांडे घ्या, त्याला तूप किंवा बटर लावून घ्या.
आता या केकच्या भांड्यात मिक्सरला बारीक केलेले वरील मिश्रण घाला.
आता हा केक ओव्हनला २०० डिग्रीवर बेक करायला ठेवा. हा केक अर्धवट बेक झाल्यानंतर यात चॉकलेटचे तुकडे घाला.
त्यानंतर, पुन्हा २० मिनिटांसाठी केक बेक करा. तुमचा चोको लावा केक तयार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.