Corn Tikki Recipe : सकाळच्या नाश्त्यामध्ये हिरव्या चटणीसोबत घ्या कॉर्न टिक्कीचा आस्वाद, एकदम सोपी आहे रेसिपी

Corn Tikki Recipe : पावसाळा सुरू झाला की, सकाळच्या नाश्त्यामध्ये काहीतरी पौष्टिक आणि चमचमीत खाण्याची सगळ्यांचीच इच्छा होते
Corn Tikki Recipe
Corn Tikki Recipeesakal
Updated on

Corn Tikki Recipe : नुकतीच पावसाळ्याला सुरूवात झाली आहे. देशातील अनेक भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पावसाळा सुरू झाला की, सकाळच्या नाश्त्यामध्ये काहीतरी पौष्टिक आणि चमचमीत खाण्याची सगळ्यांचीच इच्छा होते. या दिवसांमध्ये मक्याचे कणीस ही आवडीने खाल्ले जाते. मक्यापासून विविध प्रकारच्या रेसिपी बनवल्या जातात.

या रेसिपींपैकीच एक असलेली रेसिपी म्हणजे कॉर्न टिक्की होय. सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवण्यासाठी हा सर्वात सोपा पर्याय आहे. सकाळच्या गडबडीत तुम्ही हा पदार्थ नक्कीच ट्राय करू शकता. ही रेसिपी बनवण्यासाठी तुम्हाला फार साहित्याची गरज पडत नाही. अतिशय कमी वेळात तुम्ही हा पदार्थ बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊयात कॉर्न टिक्कीची सोपी रेसिपी.

Corn Tikki Recipe
Cucumber Sandwich Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा काकडीचे चवदार सॅंडविच, वाचा सोपी रेसिपी

कॉर्न टिक्की बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • मका – अर्धा कप (उकडलेला)

  • बटाटा – २

  • बेसन – २-३ चमचे

  • २ हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या)

  • चाट मसाला – अर्धा चमचा

  • चवीनुसार मीठ

  • ब्रेडचे तुकडे – ४ स्लाईस

  • बारीक चिरलेले आले

  • बारीक चिरलेली कोथिंबीर

कॉर्न टिक्की बनवण्याची सोपी पद्धत

  • कॉर्न टिक्की बनवण्यासाठी सर्वात आधी बटाटे उकडून घ्या.

  • त्यानंतर, त्याची साल काढून चांगले स्मॅश करून घ्या.

  • आता या स्मॅश केलेल्या बटाट्यामध्ये उकडलेला मका घाला.

  • तोपर्यंत, ब्रेडचे तुकडे करून ते मिक्सरला बारीक करून घ्या.

  • आता हे मिश्रण बटाट्यामध्ये मिसळून घ्या.

  • आता या मिश्रणात बेसन घाला, त्यासोबतच चिरलेली मिरची, किसलेले आले, कोथिंबीर, चाट मसाला आणि मीठ घालून मिक्स करा.

  • आता कॉर्न टिक्कीचे मिश्रण तयार आहे. या मिश्रणापासून आता छोटे-छोटे गोळे बनवून त्याला टिक्कीचा आकार द्या.

  • आता गॅसवर पॅन गरम करायला ठेवा आणि त्यात तेल घाला.

  • तेल गरम झाल्यावर त्यात कॉर्न टिक्की शॅलो फ्राय करून घ्या किंवा तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तळून देखील घेऊ शकता.

  • ही कॉर्न टिक्की दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत मस्त शिजवून घ्या.

  • त्यानंतर, हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत ही कॉर्न टिक्की खायला घ्या.

Corn Tikki Recipe
Soya Upma Recipe : नाश्त्यामध्ये बनवा प्रथिनांनी समृद्ध असलेला सोयाबीन उपमा, चवदारही लागणार अन् पोट ही भरणार.!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.