Kulfi Recipe : कुल्फी हेल्दी असू शकते का? हो, पण जर 'या' पद्धतीने बनवली असेल तर...

आता कुल्फी खायला घराबाहेर जाणं बंद!
Kulfi
KulfiSakal
Updated on

सध्या उन्हाळा सुरू आहे. त्यामुळे बच्चेकंपनी सहीत सगळ्यांनाच थंड खायची इच्छा रोजच होत असणार. आता रोज रोज बाहेर जाऊन आईस्क्रिम, कुल्फी किंवा थंड काहीतरी खाणं हे पोटालाही परवडणार नाही आणि खिशालाही. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक खास रेसिपी.

दूध आणि ड्रायफ्रूट्स पासून बनवलेली ही कुल्फी खाऊन तुम्हाला पुन्हा बाहेरची कुल्फी खायला जायची इच्छाच होणार नाही. जाणून घ्या रेसिपी...

साहित्य :

  • १ लीटर मलईयुक्त दूध (म्हशीचं दूध चालेल)

  • पाव कप बदाम पावडर

  • आवडत असल्यास थोडंसं केशर

  • बारीक कापलेले काजू

  • बारीक कापलेले बदाम

  • पाव कप साखर

  • २ टीस्पून कॉर्न फ्लोअर

  • २ टीस्पून दूध

  • वेलची पूड

  • बारीक कापलेले पिस्ते (थोडेसे)

Kulfi
Spinach Juice Recipe :Teenager मुलांसाठी  पालक-टोमॅटोचा रस फायदेशीर; वजन नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त

कृती :

  • दूध चांगलं उकळून घ्या.

  • दूध उकळायला सुरुवात केली की त्यामध्ये बदाम पूड टाकून मिक्स करा.

  • त्यानंतर त्यात केशर, काजू, बदाम आणि साखर टाकून मिक्स करा.

  • मध्यम आचेवर १० मिनिटे ठेवून दूध आटवून घ्या.

  • कॉर्न फ्लोअरमध्ये थोडंसं दूध घालून नीट मिक्स करून घ्या.

  • हे मिश्रण दूधामध्ये टाका.

  • त्यानंतर आणखी ४-५ मिनिटे दूध उकळू द्या.

  • गॅस बंद केल्यावर दूधामध्ये वेलची पू़ड टाका.

  • सर्व एकजीव करून घ्या व पूर्णपणे थंड होऊ द्या.

  • यानंतर हे मिश्रण कुल्फीच्या साच्यामध्ये भरा आणि रात्रभर किंवा १२-१४ तासांपर्यंत फ्रिजरमध्ये ठेवा.

  • त्यानंतर साचा थोडासा मोकळा करून घ्या आणि कुल्फीवर पिस्ते टाकून सर्व्ह करा,

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.