पौष्टिक धपाटे खाल्ले का?

वेगवेगळी पीठं एकत्र करून केलेला हा पदार्थ खाऊन पोट चांगले भरते
पौष्टिक धपाटे खाल्ले का?
Updated on

रोज नाश्त्याला काय करायचं हा अनेकांना प्रश्न असतो. वेगवेगळ्या पिठांची भाकरी अनेकजण खातात. त्यांनी शरीराला आवश्यक घटक तर मिळाल्याने हेल्दी राहण्यास मदत होते. विविध पीठ वापरून केलेले धपाटे खाल्लेत तर तुमचे पोटही भरेल आणि शरीराला आवश्यक असणाऱ्या कॅलरीजही मिळतील.

साहित्य- पाच चमचे गव्हाचे पीठ, 3 चमचे डाळीचे पीठ, 2 चमचे तांदळाचे पीठ, 1 चमचा उडदाच्या डाळीचे पीठ, आवडीनुसार तिखट, मीठ, ओवा, तीळ, दिड चमचा हळद, एक मोठा चमचा हिगं भरपूर कोथिंबीर

कृती- सर्व पीठ एकत्र करून घ्या, त्यात जेवढे तिखट हवे असेल त्याप्रमाणे तिखट, मीठ, ओवा, तिळ, हळद, हिंग, कोथिंबीर एकत्र करा. पाणी घालून पोळीच्या कणकेप्रमाणे कणीक मळून घ्या. पोळीप्रमाणेच लाटून घेऊन तव्यावर खरपूस भाजून घ्या. टोमॅटो सॉस, लोण्याबरोबर हे धपाटे चविष्ट लागतात. प्रवासासाठी नेणार असाल तरी दोन ते तिन दिवस टिकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.