इडली, डोसा, मेदूवडा, उत्तपा हे साऊथ इंडियन पदार्थ संपूर्ण भारतात आवडीने खाल्ले जातात. मुंबईसह अनेक शहरांमध्ये याचे छोटे-मोठे स्टॉल्स दिसतात. यात इडली हा पदार्थ अनेक जण चवीने खातात. जर तुम्हालाही नाश्त्यात काहीतरी वेगळे खायचे असेल तर यावेळी तुम्ही फ्राईड रवा इडलीची रेसिपी नाश्त्यात करून पाहू शकता. फ्राईड रवा इडली बनवणंही खूप सोपं आहे जी कमी खर्चात आणि कमी वेळेत झटपट तयार होते.
इडली- ७-८
मोहरी - अर्धा टीस्पून
कढीपत्ता- ४-५
हिरवी मिरची - २ चिरून
मीठ - चवीनुसार
हळद - १/२ टीस्पून
मिरची पावडर - १/२ टीस्पून
कोथिंबीर - १ टेबलस्पून चिरलेली
तूप किंवा तेल - १ टेबलस्पून
फ्राईड रवा इडली बनवण्यासाठी प्रथम इडलीचे तुकडे करा. आता कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्या. तवा गरम करून त्यात तूप किंवा तेल घाला. त्यात कढीपत्ता, मोहरी आणि हिरवी मिरची टाका आणि इडलीचे बारीक तुकडे टाका. हळद, लाल तिखट, मीठ घालून मिक्स करा. त्यात चिरलेली कोथिंबीर घालून प्लेटमध्ये काढा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कांदा आणि टोमॅटोही चिरून टाकू शकता. त्यामुळे ही फ्राईड इडली आणखी पौष्टिक आणि खायला चविष्ट होईल. फ्राईड रवा इडली तयार आहे. हिरवी चटणी आणि लाल टोमॅटो सॉससोबत गरमागरम आस्वाद घ्या.