Banana Toast Recipe : रोज सकाळच्या नाश्त्यामध्ये काय बनवावे? असा प्रश्न अनेकांना पडतो. बरं रोजचा तोच नाश्ता जसे की, पोहे, उपमा, इडली आणि सॅंडविच इत्यादी पदार्थ खाऊन बोअर होत. या थंडीच्या दिवसांमध्ये काही तरी हेल्दी आणि चविष्ट खावे, असे अनेकांना वाटते.
आज आम्ही तुम्हाला अशीच एक रेसिपी सांगणार आहोत. जी सकाळच्या गडबडीमध्ये बनवायला अतिशय सोपी असून खायला देखील चविष्ट आहे. या रेसिपीचे नाव आहे बनाना टोस्ट. चला तर मग जाणून घेऊयात ही रेसिपी.
१ केळी (बारीक चिरलेले स्लाईसमध्ये)
२ ब्राऊन ब्रेड स्लाईस
२ चमचे पीनट बटर
१ चमचा भाजलेले शेंगदाणे
सर्वात आधी एका गॅसवर पॅन किंवा तवा गरम करायला ठेवा.
तवा किंवा पॅन गरम झाल्यानंतर तुमचे ब्राऊन ब्रेड दोन्ही बाजूंनी भाजून घ्या.
आता हे ब्रेड स्लाईसेस भाजल्यानंतर एका डिशमध्ये काढून घ्या.
या दोन्ही डिशवर १ चमचा पीनट बटर लावून घ्या.
तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यावर फ्रूट जॅम देखील लावू शकता.
आता यावर केळ्याचे चिरलेले स्लाईसेस ठेवा.
या केळीच्या स्लाईसेसवर थोडेफार भाजलेले शेंगदाणे ठेवा.
तुमचा टेस्टी आणि हेल्दी बनाना टोस्ट रेडी आहे.
सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा सायंकाळी चहासोबत तुम्ही हा बनाना टोस्ट नक्कीच ट्राय करू शकता.
सकाळच्या गडबडीमध्ये करण्यासारखा हा एक बेस्ट हेल्दी आणि टेस्टी ऑप्शन आहे. त्यामुळे, तुम्ही सुद्धा ही सोपी रेसिपी नक्की ट्राय करून पाहा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.