Mango-Pineapple Smoothie : मे महिन्याला नुकतीच सुरूवात झाली आहे आणि उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळे, या दिवसांमध्ये आरोग्याची खास काळजी घेणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात शरीर थंड ठेवणे खूप गरजेचे आहे. उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता भासणार नाही याची पूर्ण काळजी घेणे गरजेचे आहे.
या स्थितीमध्ये भरपूर पाणी पिण्यासोबतच तुम्ही आहारात ज्यूस आणि स्मूदीचाही समावेश करू शकता. स्मूदीजचा आहारात समावेश केल्याने शरीर हायड्रेटेड ठेवण्यास मदत होते. विविध प्रकारची फळे, आईसक्रीम, दूध किंवा दही मिसळून स्मूदीज बनवल्या जातात.
या सिझनमध्ये आंबा आणि अननसाच्या फळापासून तुम्ही घरच्या घरी स्मूदी बनवू शकता आणि निरोगी राहू शकता. चला तर मग जाणून घेऊयात आंबा-अननसाची स्मूदी बनवण्याची सोपी रेसिपी.
१ पिकलेला आंबा
अननस पाऊण वाटी
संत्र्याचा रस १ कप
बर्फाचे तुकडे
गार्निशिंगसाठी आंब्याचे आणि लिंबाचे तुकडे
आंबा आणि अननसाची स्मूदी बनवण्यासाठी सर्वात आधी पिकलेल्या आंब्याचा गर काढून घ्या.
स्मूदी बनवण्यापूर्वी किमान अर्धा तास आधी आंब्याचा गर आणि अननसाचे तुकडे फ्रीजमध्ये काही वेळासाठी ठेवा.
त्यानंतर, मिक्सरच्या भांड्यात आंब्याचा गर, अननसाचे तुकडे, बर्फाचे तुकडे आणि संत्र्याचा रस मिसळून चांगल्या प्रकारे मिक्सरला फिरवून घ्या.
तुमची आंबा अन् अननसाची स्मूदी तयार आहे.
आता काचेच्या ग्लासमध्ये ही स्मूदी काढून घ्या.
त्यानंतर, आंबा आणि लिंबाच्या तुकड्यांचा वापर करून स्मूदी छान प्रकारे गार्निश करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.