Methi Paratha Recipe : नाश्त्यासाठी बनवा ढाबा स्टाइल मेथी पराठा, जाणून घ्या रेसिपी!

पचनक्रिया सुधारण्यासोबतच मेथी रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासही मदत करते. अशा परिस्थितीत मेथीचा पराठा केवळ चवदारच नाही तर आरोग्यदायी पर्यायही आहे.
Methi Paratha
Methi Parathasakal

नाश्ता असो वा दुपारचे आणि रात्रीचे जेवण, मेथी पराठा हा प्रत्येकासाठी योग्य खाद्य पदार्थ आहे. चविष्ट मेथी पराठा आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. मेथीच्या भाजीबरोबरच त्यापासून अनेक प्रकारचे पदार्थ बनवले जातात. पचनक्रिया सुधारण्यासोबतच मेथी रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासही मदत करते. अशा परिस्थितीत मेथीचा पराठा केवळ चवदारच नाही तर आरोग्यदायी पर्यायही आहे.

मेथीचा पराठा बनवणे अगदी सोपे आहे. ही रेसिपी बनवायला जास्त वेळ लागत नाही आणि मुलांनाही मेथीचे पराठे खायला आवडतात. जर तुम्हाला चविष्ट आणि कुरकुरीत मेथी पराठे बनवायचे असतील तर चला जाणून घेऊया याची सोपी रेसिपी.

Methi Paratha
Makhana Cutlet Recipe : नाश्त्यासाठी बनवा टेस्टी आणि हेल्दी 'मखाना कटलेट', वाचा ही सोपी रेसिपी

मेथी पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

गव्हाचे पीठ - 2 कप

मेथी

दही - 1/4 कप

जिरे - 1/2 टीस्पून

हळद - 1/2 टीस्पून

आले पेस्ट - 1 टीस्पून

लाल तिखट - 1/2 टीस्पून

तेल

मीठ - चवीनुसार

मेथी पराठा बनवण्याची पद्धत

चविष्ट मेथीचे पराठे बनवण्यासाठी प्रथम मेथी बारीक चिरून घ्या. आता एक मोठी वाटी घ्या आणि त्यात पीठ घ्या. यानंतर मेथी टाका आणि चांगले मिसळा. आता या मिश्रणात दही घालून मिक्स करा. दही वापरल्याने मेथीमध्ये कडूपणा असेल तर तो कमी होतो.

यानंतर या मिश्रणात हळद, तिखट, जिरे, आल्याची पेस्ट आणि चवीनुसार मीठ घालून सर्वकाही चांगले मिसळा. यानंतर थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्या. तसेच पिठात 2 चमचे तेल घाला, त्यामुळे पराठे मऊ आणि कुरकुरीत होतील. आता पीठ ओल्या सुती कापडाने झाकून अर्धा तास बाजूला ठेवा.

यानंतर, पीठाचे छोटे छोटे गोळे बनवून घ्या आणि त्या प्रत्येक गोळ्याला पराठ्यासारखा गोल आकार द्या. तवा गरम करुन त्यावर पराठा दोन्ही बाजूंनी चांगला खुसखुशीत भाजून घ्या. अशारितीने तयार झाले आपले गरमा गरम, खमंग आणि पौष्टिक असे मेथीचे पराठे!

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com