Oats Chilla Recipe : डाएट करणाऱ्यांनी नाश्त्यात खावा ओट्स चिला; वजन होणार झटक्यात कमी

आज आम्ही तुम्हाला ओट्स चिला कसा बनवायचा याविषयी सांगणार आहोत.
Oats Chilla Recipe
Oats Chilla Recipe
Updated on

Oats Chilla Recipe : ओट्स हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. यामध्ये फायबर, अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. ओट्स वजन कमी (Oats for weight loss) करण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी देखील प्रभावी आहेत. नाश्त्यामध्ये ओट्सचे खाणे अधिक चांगले असते

नेहमी फक्त ओट्स खाऊन आपण बोअर होतो. त्यामुळे तुम्ही ओट्सची अनोखी डिश खाऊ शकता. आज आम्ही तुम्हाला ओट्स चिला कसा बनवायचा याविषयी सांगणार आहोत. चला तर रेसिपी जाणून घेऊया. (how to make oats chilla recipe read story for healthy lifestyle)

साहित्य :

१ कप ओट्स २ चमचे रवा

१ चमचा बेसन पीठ

१ मध्यम आकाराचा कांदा

१ सिमला मिरची १ टोमॅटो

२ हिरव्या मिरच्या

Oats Chilla Recipe
Bhaubeej Food Recipe : भाऊबीज- पाडव्याच्या निमित्ताने करा बासुंदी, मासलेभात आणि कोथिंबीर वडीचा स्पेशल बेत
  • पाव चमचा हळद

  • पाव चमचा जिरेपूड

  • अर्धा चमचा आमचूर पावडर

  • अर्धा चमचा लाल मिरची पावडर

  • १ चमचा आलं-लसूण पेस्ट

  • बारीक चिरलेली कोथिंबीर

  • १ चमचा तेल आणि चवीनुसार मीठ

Oats Chilla Recipe
Food Recipe : उपवासाचे तेच पदार्थ खाण्याची इच्छा नाहीये? एकादशी निमित्त बनवा खमंग भगरीचे धिरडे

कृती :

  • ओट्स कोरड्या पॅनमधे घ्या. ते २-३ मिनिटं मध्यम आचेवर गरम करा.

  • थोडे थंड झाल्यानंतर त्यामध्ये रवा, बेसन, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली सिमला मिरची, टोमॅटो, हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, थोडं आलं, हळद, जिरेपूड, आमचूर पावडर, लाल तिखट हे सर्व साहित्य एकत्र करून घ्या.

  • त्यामध्ये गरजेनुसार पाणी घाला.

  • धिरडे वा आंबोळीच्या पिठासारखे सरसरीत झाले की दहा मिनिटं सर्व मिश्रण थोडं भिजू द्या.

  • नंतर चवीनुसार मीठ घाला. कोथिंबीर बारीक चिरून घाला.

  • त्यानंतर तवा तापवून, थोडंसं तेल लावून तव्यावर छोटे छोटे डोसे घातल्याप्रमाणे चिला घालून घ्या.

  • दोन्ही बाजूंनी नीट भाजले की हिरवी चटणी किंवा रायत्याबरोबर खायला द्या.

    रेसिपी - अजिता बुरांडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.