Palak Paratha Recipe: ब्रेकफास्टसाठी बनवा हेल्दी पालक पराठा! जाणून घ्या रेसिपी

पालक पराठा खायला जितका खुसखुशीत आणि चविष्ट आहे तितकाच बनवायलाही सोपा आहे.
Palak Paratha
Palak Parathasakal
Updated on

आपल्याला रोज सकाळच्या नाश्त्यासाठी गरमागरम पदार्थ खावेसे वाटतात. पण नाश्ता बनवण्याचा कंटाळा देखील येतो. अशातच वेगवगेळे पराठे आवर्जून बनवले जातात. तुम्ही आजपर्यंत नाश्त्यात कोबी, बटाटा, मुळा यापासून बनवलेले पराठे अनेकदा बनवले असतील.

पण आज आम्ही तुम्हाला पालक पराठा बनवण्याची खास रेसिपी सांगत आहोत. पालक पराठा खायला जितका खुसखुशीत आणि चविष्ट आहे तितकाच बनवायलाही सोपा आहे. चला तर मग जाणून घेऊया हे चविष्ट पालक पराठे कसे बनतात.

Palak Paratha
Sweet Potato Sheera Recipe: पौष्टिक असणाऱ्या रताळ्याचा शिरा कसा तयार करायचा? जाणून घ्या रेसिपी

पाहुयात कसे बनवायचे पराठे

साहित्य - मैदा 2 कप, चिरलेला पालक 2 कप, आले चिरून 1/2 टीस्पून, लसूण, लवंग, कोथंबिर, हिरवी मिरची 2, तेल 3-4 टीस्पून आणि चवीनुसार मीठ.

कृती

पालक सोबत हिरवी मिरची आणि आले घालून बारीक प्युरी तयार करा. आता गव्हाच्या पीठात तयार केलेली प्युरी मीठ आणि तूप मिक्स करून कणिक भिजवा. आता पीठ 20 मिनिटे झाकून ठेवा. आता थोडं तूप घालून पीठ मॅश करा. आता छोटे छोटे गोळे घेवून चपातीसारखे पातळ लाटा. तवा गरम करून त्यावर थोडं तूप टाका, त्यानंतर पराठा तव्यावर मध्यम आचेवर भाजून घ्या. तुमचा चविष्ट पालक पराठा तयार आहे. सकाळी नाश्त्यात दह्यासोबत किंवा चटणी सोबत सर्व्ह करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.