Tamatar Chaat Recipe: नीता अंबानींनी खाल्लेली वाराणसीची प्रसिद्ध टोमॅटो चाट घरीच बनवा, लगेच ही सोपी रेसिपी नोट करा

नीता अंबानी यांनी वाराणसीला भेट दिली अन् तेथिल लोकप्रिय टमाटर चॅट आणि आलू टिक्कीचा आस्वाद घेतला.
how to make popular nita ambani favorite Varanasi tamatar chaat recipe
how to make popular nita ambani favorite Varanasi tamatar chaat recipe
Updated on

दोन दिवसांपूर्वी रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा, नीता अंबानी यांनी वाराणसीला भेट दिली. यावेळी त्यांनी काशी विश्वनाथ मंदिराचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांची पावलं वाराणसीतल्या प्रसिद्ध काशी चाट सेंटरकडे वळली. या ठिकाणी जाऊन त्यांनी टमाटर चॅट आणि आलू टिक्कीचा आस्वाद घेतला. या क्षणाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले अन् खवय्यांमध्ये चर्चा सुरु झाली ती म्हणजे टमाटर चॅटची. अनेक गृहिणी टमाटर चॅट कसा बनवायचा हे सर्च करु लागल्या. तर त्यांच्यासाठी घेऊन आलो आहोत खास टमाटर चॅटची रेसिपी.

टमाटर चॅट बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • चार टोमॅटो (बारिक चिरलेले)

  • एक कांदा (बारिक चिरलेले)

  • 1/2 उकडलेले पांढरे वटाणे

  • एक उकडलेला बटाटा

  • एक चमचा खिसलेले आलं

  • तीन किंवा चार (तिखटानुसार) बारीक चिरलेली हिरवी मिरची

  • बारीक चिरलेली कोथिंबीर

  • एक चमचा लिंबूचा रस

  • एक चमचा काश्मिरी लाल मिरची

  • 1/2 गरम मसाला

  • 1/2 सेंद्रीय मीठ

  • एक चमचा जीरा पावडर

  • चवीनुसार चिंचेची चटणी

  • तीन किंवा चार चमचे तेल

how to make popular nita ambani favorite Varanasi tamatar chaat recipe
Rava Dosa Recipe : डाळ-तांदूळ भिजवण्याची झंझंट नकोच, रवा अन् बटाट्याचा बनवा क्रिस्पी डोसा

कृती

टमाटर चाट बनवण्यासाठी सर्वात प्रथम कढईमध्ये तीन मोठ चमचे तेल गरम करा. त्यामध्ये आलं, हिरवी मिरची आणि कांदा घाला. कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत तेलामध्ये परतवा. त्यामध्ये टोमॅटो आणि 1/2 मीठ घाला आणि पाच मिनिट ते शिजवा.

त्यानंतर त्यामध्ये गरम मसाला, काश्मिीर लाल मिरची पावडर, जीरा पावडर घाला आणि हे सर्व एकजीव करा.

मिश्रण एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये उकडलेला बटाटा घालून ते मिश्रण पुन्हा परवुन घ्या. त्यानंतर त्यामध्ये उकडलेले वाटाणे आणि अर्धा कप पाणी घाला आणि दोन मिनिट ते शिजवा.

how to make popular nita ambani favorite Varanasi tamatar chaat recipe
Healthy And Tasty Recipes: टिफिनसाठी झटपट बनवा 'हे' 3 चवदार पदार्थ

यानंतर त्यात हिरवी चटणी, गोड आणि आंबट चटणी, कोथिंबिर, आणि चवीनुसार काळे मीठ घालून एकजीव करून गॅस बंद करा. -आता तयार केलेला पदार्थ प्लेटमध्ये ठेवा, नंतर त्यावर बारीक चिरलेला कांदा, मिरची आणि हिरवी कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com