Sabudana Paratha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट साबुदाणा पराठा, पोषणासोबतच मिळेल भरपूर ऊर्जा, वाचा सोपी रेसिपी

Sabudana Paratha Recipe : आरोग्यासाठी फायदेशीर असणाऱ्या या साबुदाण्यापासून चविष्ट असा पराठा बनवला जातो.
Sabudana Paratha Recipe
Sabudana Paratha Recipeesakal
Updated on

Sabudana Paratha Recipe : सकाळच्या नाश्त्यामध्ये पोहे, उपमा, इडली आणि कधीतरी खिचडी खायला आपल्यातील अनेकांना आवडत असेल. परंतु, साबुदाण्यांपासून केवळ खिचडी बनवता येते का? तर असे अजिबात नाही. साबुदाण्यांपासून विविध प्रकारचे खाद्यपदार्थ आवर्जून बनवले जातात.

साबुदाण्यामध्ये असलेले स्टार्च आणि साखर आपल्या शरीराला स्टार्च आणि साखर प्रदान करतात. जे आपल्या सक्रिय दिनचर्येसाठी अतिशय उत्तम आहे. साबुदाण्याचे सेवन केल्याने मधुमेह असलेल्या रूग्णांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते.

शिवाय, साबुदाणा सेंद्रियपणे ग्लुटेनमुक्त असल्यामुळे गव्हाच्या जागी देखील याचा वापर करता येतो. आरोग्यासाठी फायदेशीर असणाऱ्या या साबुदाण्यापासून चविष्ट असा पराठा बनवला जातो. हा पराठा आपल्या शरीराला पोषण ही देतो आणि भरपूर ऊर्जा प्रदान करतो. आज आम्ही तुम्हाला साबुदाणा पराठ्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात साबुदाणा पराठा रेसिपी.

साबुदाणा पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • १ वाटी साबुदाणा

  • २ बटाटे उकडून घेतलेले

  • अर्धा चमचा जिरे पावडर

  • ४ चमचे शेंगदाण्याचा कूट

  • अर्धा चमचा आल्याची पेस्ट

  • बारीक चिरलेली कोथिंबीर

  • १ चमचा लिंबाचा रस

  • १ चमचा पीठीसाखर

  • आवश्यकतेनुसार तेल

साबुदाणा पराठा बनवण्याची सोपी पद्धत :

  • सर्वात आधी साबुदाणा नीट धुवून घ्या आणि २-३ तास भिजत घाला.

  • त्यानंतर, उकडलेले बटाटे स्मॅश करून साबुदाण्यासोबत चांगले मिसळून घ्या.

  • आता या मिश्रणात जिरेपूड, शेंगदाणा कूट आल्याची पेस्ट, कोथिंबीर, लिंबाचा रस, पीठी साखर आणि मीठ घालून चांगले मिश्रण मळून घ्या.

  • या मळून घेतलेल्या मिश्रणाचा एक लहानसा गोळा तळहातावर घ्या तो सपाट करा आणि त्याला थापून पराठ्याचा आकार द्या.

  • पराठा करण्याआधी तुमच्या दोन्ही हातांच्या तळहातांवर तेल लावून घ्या.

  • आता हातावर थापून घेतलेला साबूदाणा पराठा गमर तव्यावर घाला.

  • तवा गरम होताच, तेल लावून दोन्ही बाजूंनी हा साबुदाणा पराठा शिजवून घ्या.

  • तुमचा गरमागरम साबुदाणा पराठा तयार आहे. रायत्यासोबत किंवा दह्यासोबत हा पराठा सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.