Evening Snacks : चहासोबत नक्की ट्राय करा टेस्टी ब्रेड पोहा, एकदम सोपी आहे रेसिपी

हा ब्रेड पोहा तुम्ही संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये चहासोबत नक्कीच ट्राय करू शकता.
Evening Snacks
Evening Snacksesakal
Updated on

Evening Snacks : सकाळच्या नाश्त्यामध्ये गरमागरम पोहे खायला सर्वांनाच आवडते. हा सर्वांच्या आवडीचा नाश्ता आहे, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. परंतु, हे साधे पोहे तुम्ही नेहमीच खात असाल, आज आम्ही तुम्हाला खास संध्याकाळी खाल्ली जाणारी ब्रेड पोह्याची रेसिपी सांगणार आहोत.

हा ब्रेड पोहा तुम्ही संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये चहासोबत नक्कीच ट्राय करू शकता. ही ब्रेड पोह्याची रेसिपी एकदम सोपी आहे. शिवाय, ही झटपट करता येणारी रेसिपी आहे. चला तर मग जाणून घेऊयात ब्रेड पोह्याची ही टेस्टी रेसिपी.

Evening Snacks
Healthy Breakfast Recipe : नाश्त्यासाठी झटपट बनवा पौष्टिक गाजर चीज टोस्ट, ट्राय करा ‘ही’ सोपी रेसिपी

ब्रेड पोहा बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे

  • ४ ब्रेडचे स्लाईस

  • भाजलेले शेंगदाणे मूठभर

  • ३-४ हिरव्या मिरच्या

  • कढीपत्ता

  • तेल

  • जिरे

  • मोहरी

  • हिंग

  • अर्धी वाटी मटार

  • कोथिंबीर

  • चवीनुसार मीठ

  • लिंबाचा रस (आवश्यकतेनुसार)

ब्रेड पोहा बनवण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे :

  • ब्रेड पोहा बनवण्यासाठी सर्वात आधी एका पॅनमध्ये तेल गरम करा.

  • आता तेल गरम झाल्यावर त्यात जिरे-मोहरी, हिंग, हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घाला.

  • फोडणी झाल्यावर आता त्यात मटार आणि शेंगदाणे घालून चांगले परतून घ्या.

  • शेंगदाण्यांचा रंग सोनेरी झाल्यावर त्यात हळद आणि मीठ घाला.

  • आता सर्व घटक छान एकत्र केल्यानंतर ब्रेडच्या स्लाईसचे तुकडे करून ते पॅनमध्ये छान मिक्स करून घ्या. त्यावर कोथिंबीर घाला.

  • हवे असल्यास यात तुम्ही लिंबाचा रस देखील मिसळू शकता. आता गरमागरम ब्रेड पोहा सर्व्ह करा.

Evening Snacks
Healthy Breakfast Recipe : ओट्स खाऊन कंटाळा आला? मग, नाश्त्याला बनवा हेल्दी आणि टेस्टी ओट्स डोसा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.