Republic Day 2024 : अवघ्या काही दिवसांवर प्रजासत्ताक दिन येऊन ठेपला आहे. प्रजासत्ताक दिन हा भारतीयांसाठी खूप खास असतो. भारतातील प्रत्येक नागरिक हा खास दिवस साजरा करतो. प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळा, महाविद्यालयांमध्ये आणि सरकारी कार्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. हा प्रजासत्ताक दिन प्रत्येक जण आपापल्या परीने साजरा करतो.
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी संपूर्ण देश हा तिरंग्यात न्हाऊन जातो. प्रजासत्ताक दिनाचा हा दिवस खास बनवण्यासाठी तुम्ही देखील घरच्या घरी काही तिरंगा स्पेशल रेसिपी बनवू शकता. खास प्रजासत्ताक दिनानिमित्त आम्ही तुम्हाला तिरंगा स्पेशल सॅंडविचची रेसिपी सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात ही तिरंगा स्पेशल सॅंडविच रेसिपी.
ब्रेडचे स्लाईस
मेयोनिज
कोबी (बारीक किसून घेतलेला)
गाजर (किसलेला गाजर)
शेजवान सॉस
पुदिन्याची चटणी
बटर
मीठ
सॅंडविच बनवण्यासाठी सर्वात आधी एका बाऊलमध्ये किसलेला कोबी, किसलेला गाजर, मेयोनिज आणि मीठ टाका. हे सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे एकत्र करा.
आता एका ब्रेडला शेजवान सॉस लावा. त्यानंतर, हे सॅंडविचचे मिश्रण ब्रेडवर लावून घ्या.
आता दुसऱ्या ब्रेडला बटर लावून घ्या आणि त्यावर हे मिश्रण लावून घ्या.
आता तिसरा ब्रेड घ्या. या तिसऱ्या ब्रेडला पुदिन्याची चटणी लावून घ्या आणि त्यावर सॅंडविचसाठी बनवलेले मिश्रण लावून ब्रेड कव्हर करून घ्या.
तुमचे तिरंग स्पेशल सॅंडविच तयार आहे. हे सॅंडविच आता तुम्हाला हवे त्या प्रमाणे कट करून खाण्यासाठी सर्व्ह करा.
तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या सॅंडविचवर चीज किसून घालू शकता.
आता या सॅंडविचसोबत तुम्ही टोमॅटो सॉस किंवा चटणी खाऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.