Watermelon Juice Recipe: कलिंगडाचे फायदे आणि वैशिष्ट्य सांगण्यासाठी दरवर्षी ३ ऑगस्टला राष्ट्रीय कलिंगड दिवस साजरा केला जातो. कलिंगडामध्ये ९० टक्के पाणी असते. यामुळे उन्हाळ्यात याचे सेवन करण्याचा सल्ला डॉक्टर देखील देतात. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करते तसेच त्वचेसाठी देखील हे फळ फायदेशीर असते.
कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण आणि फायबर खुप असते आणि कॅलरी कमी असते. यामुळे वजन नियत्रंणात ठेवण्यास मदत करते. कलिंगडाचा रस प्यायल्याने दिवसभर उत्साही राहू शकता. चला तर मग जाणून घेऊया सोप्या पद्धतीने घरी कलिंगडाचा रस कसा बनवायचा.
कलिंगड - १
पुदिन्याचे पान- ४-५
काळे मीठ - १-२ चमचे
साखर- १ चमचा
लिंबू- १-२
बर्फाचे तुकडे - २-३
कलिंगडाचा रस बनवण्यासाठी सर्वात आधी कलिंगड स्वच्छ धुवावे. नंतर त्याच्या छोट्या फोडी करून त्यातील बीया काढून टाकाव्या. नंतर मिक्सरमध्ये पुदिन्याचे पाने, काळे मीठ,साखर, कलिंगडाचे तुकडे टाकून बाकिक करून घ्यावे. नंतर एका मोठ्या चाळणीतून गाळून घ्यावे. नंतर त्यामध्ये लिंबाचा रस टाकावा. नंतर सर्व्ह करताना बर्फाचे तुकडे आणि पुदिन्याचे पान टाकावे.
कलिंगडाचा रस प्यायल्याने रोगप्रतिकार शक्ती मजबुत होते. यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. तसचे यामध्ये असलेले फायबर आतडे निरोगी ठेवते. तसेच ज्या लोकांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे त्यांना हा रस पिल्यास समस्या कमी होते. अॅसिडिटीचा त्रास कमी होते. तसेच चेहरा चमकदार बनतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.