Kitchen Hacks: फ्रिजमध्ये चिरलेल्या भाज्या आठवडाभर ताज्या ठेवायच्यात? या टिप्स करा फॉलो

भाज्या आधीच चिरुन ठेवल्याने बराच वेळ वाचतो, याचबरोबर आयत्या वेळी घाईगडबड होत नाही.
How to store cut vegetables in Fridge
How to store cut vegetables in Fridge
Updated on

प्रत्येक गृहिणीला सकाळची धावपळ असते. मुलांचा डबा, नवऱ्याचा डबा, त्यात नाश्त्याची तयारी. या सर्व गोंधळात भाजी हा मोठा प्रश्न असतो. प्रत्येकाच्या आवडी निवडी जपताना नाकीनऊ येत. यातचं भाज्या निवडून करायच्या म्हटल्यावर खुप गोंधळ उडतो. त्यासाठी काही गृहिणी भाज्यांची तयारी आधीच करतात. पण अनेक महिलांचा प्रश्न हा असतो की, भाज्या निवडुण किंवा चिरुन फ्रिजमध्ये ठेवल्या तर त्या खराब होतात.

तर त्याचं उत्तर नाही. चिरलेल्या भाज्यांची विशेष काळजी घेतली तर कोणत्याच महिलेला ही समस्या उद्भवणार नाही. उलट भाज्या आधीच चिरुन ठेवल्याने बराच वेळ वाचतो, याचबरोबर आयत्या वेळी घाईगडबड होत नाही. भाज्या फ्रिजमध्ये आहेत तशाच ठेवण्यापेक्षा त्या चिरून स्टोअर करणे अधिक फायदेशीर ठरते.

तर फ्रिजमध्ये चिरलेल्या भाज्या आठवडाभर ताज्या कशा ठेवायच्या हे जाणून घेऊ.

How to store cut vegetables in Fridge
Kitchen Hacks: कितीही लक्ष दिलं तरी दूध उतू जातं? 'या' टिप्स करा फॉलो

तेलाचा वापर करा

बटाटे, वांगी यांसारख्या भाज्या कापल्यानंतर त्यांना हलक्या हातानी तेल लावा. असं केल्याने या फळभाज्यांना हवा लागणार नाही. या ट्रिकच्या मदतीने तुम्ही भाजी खराब होण्यापासून तर वाचवू शकताच पण तिचा ताजेपणाही टिकून राहील.

चिरलेल्या भाज्या धुवू नका

चिरलेल्या भाज्या आठवडाभर ताज्या ठेवायच्या असतील तर त्या धुवू नका. चिरलेल्या भाज्या पाण्याने धुवून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्या तर त्या सडू शकतात. त्यामुळे भाज्या कापल्या गेल्या असतील तर त्या न धुता झिप लॉक बॅगमध्ये ठेवा.

चिरलेल्या भाज्यांचा ओलावा कमी करा

चिरलेल्या भाज्यांमधील ओलाव्यामुळे बॅक्टेरिया आणि बुरशीची वाढ होऊ शकते, त्यामुळे भाज्या कोरड्या ठेवणे फार महत्वाचे आहे. चिरलेल्या भाज्या नीट वाळवा आणि डबा टिश्यू किंवा टॉवेलने पुसून टाका. अतिरिक्त ओलावा सुकविण्यासाठी कंटेनरच्या तळाशी टिश्यू पेपर ठेवता येतो. त्यावर झाकण ठेवून वाळलेल्या भाज्या ठेवा.

How to store cut vegetables in Fridge
Kitchen Tips: डब्यातील भाजी बॅगमध्ये सांडते? 'या' ट्रिक्स वापरुन पाहा

लिंबाचा रस

भोपळा, फणस यांसारख्या भाज्या कापल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायच्या असतील तर आधी त्यावर आंबट रस किंवा लिंबाचा रस घाला. त्यामुळे भाजी फार काळ खराब होणार नाही आणि त्यांचा ताजेपणाही कायम राहील.

एअर टाइट कंटेनर वापरा

चिरलेल्या भाज्या स्टोअर करायच्या असतील तर एअर टाइट कंटेनरचा वापर करा. असे केल्याने चिरलेल्या भाज्या खुल्या हवेच्या संपर्कात येणार नाहीत. लक्षात ठेवा की बॉक्समध्ये कापड किंवा टॉवेल ठेवण्यास विसरू नका. कारण ते भाजीचा ओलावा शोषून घेते त्यामुळे भाजी खराब होत नाही.

How to store cut vegetables in Fridge
Kitchen Hacks: लसूण सोलायचा कंटाळा आलाय? या जबरदस्त ट्रिक्स तुमच्या कामी येतील

चिरलेल्या भाज्या स्टोअर करताना घ्या काळजी

चिरलेल्या भाज्या स्टोअर करताना खास काळजी घ्यावी लागते. टोमॅटो इथिलीन वायू सोडतात म्हणून तुम्ही त्यांना पालेभाज्या, कोबी, गाजर, ब्रोकोलीपासून वेगळे ठेवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.