हिरवी मिरची जास्त दिवस टिकत नाही, मग या पद्धतीने करा Green Chille स्टोअर अनेक दिवस राहिल एकदम ताजी

how to store green chilli: दररोज बाजारात जाऊन ताजी हिरवी मिरची आणणं तसं अनेकांना शक्य नसतं. यासाठीच आम्ही तुम्हाला हिरवी मिरची स्टोर करण्याच्या काही टिप्स देणार आहोत
how to store green chilli for long time
how to store green chilli for long timeEsakal
Updated on

How to store green chilli: आपल्या स्वयंपाकासाठी Cooking लागणाऱ्या महत्वाच्या सामुग्रीमधील एक महत्वाची सामुग्री म्हणजे हिरवी मिरची Green Chille. खास करून अनेक भारतीय पदार्थांमध्ये हिरव्या मिरचीचा वापर हमखास केला जातो.

त्यामुळे स्वयंपाकासाठी कायमच हिरवी मिरची घरात ठेवावी लागते. मात्र ही रोज लागणारी हिरवी मिरची फार काळ टिकत नसल्याने मोठा गोंधळ होतो. How to Store Green Chille without drying

हिरवी मिरची उघडी फ्रिज Refrigerator बाहेर ठेवली तर ती २ दिवसातच वाळून जाते आणि जरी तुम्ही हिरवी मिरची फ्रिजमध्ये ठेवत असाल, तरी ती फार काळ टिकत नाही. अगदी ३-४ दिवसातच मिरची Green Chille खराब होते. त्यामुळे बऱ्याचदा ही वाळलेली किंवा खराब झालेली मिरची केराच्या डब्ब्यात टाकून द्यावी लागते.

दररोज बाजारात जाऊन ताजी हिरवी मिरची आणणं तसं अनेकांना शक्य नसतं. यासाठीच आम्ही तुम्हाला हिरवी मिरची स्टोर करण्याच्या काही टिप्स देणार आहोत. या टिप्सच्या मदतीने तुम्ही मिरची स्टोर केली तर ती खराब होणार नाही शिवाय अनेक दिवस ताजी राहील.

टिश्यू पेपर- जर तुम्हाला मिरची अनेक दिवसांसाठी ताजा ठेवायची असेल तरी तुम्ही टिश्यू पेपरचा वापर करू शकता. यासाठी किचनसाठी बाजारामध्ये उपलब्ध असलेले थोडे मोठे आणि जाड टिश्यू वापरा. काही स्टेप्सच्या मदतीने तुम्ही मिरची स्टोर करू शकता.

बाजारातून मिरच्या आणल्यानंतर त्या सर्वप्रथम स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर मिरच्या १५ मिनिटांसाठी पाण्यामध्ये ठेवा. १५ मिनिटांनी मिरच्या पाण्यातून काढून निथळू द्या. त्यानंतर त्या एकाद्या मोठ्या टिश्यू पेपरवर किंवा किचन टॉवेलवर कोरड्या होण्यासाठी पसरवून ठेवा.

यानंतर मिरच्यांची देठं काढून टाका. मिरच्या निवडणं देखील अत्यंत गरजेचं आहे. अनेकदा एक मिरची खराब झाली असल्यास त्यामुळे इतर अनेक मिरच्या खराब होवू शकतात. यासाठी खराब मिरच्या बाजूला करा. आता एका हवाबंद डब्यामध्ये तळाला एक टिश्यू पेपर टाका. त्यावर सर्व मिरच्या ठेवा.

त्यानंतर पुन्हा वरून एक टिश्यू पेपर ठेवून डबा बंद करून तुम्ही फ्रिजमध्ये ठेवू शकता. जर तुम्हाला जास्त प्रमाणात मिरच्या स्टोर करायच्या असतील तर त्या एकाच डब्यात ठेवू नका. २-३ दिवसांच्या वापरायच्या मिरच्या वेगळ्या लहान डब्यात तुम्ही ठेवू शकता.

  • यामुळे सगळ्या मिरच्यांचा डबा सारखा उघडबंद होणार नाही आणि मिरच्या जास्त काळ टिकतील.

  • हवा बंद डब्याएवजी तुम्ही बाजारात मिळणाऱ्या झिप लॉक बॅगचा देखील वापर करू शकता.

  • यासाठी स्वच्छ केलेल्या काही मिरच्या टिश्यू पेपरमध्ये गुंडाळून त्या झिपलॉक बॅगमध्ये ठेवा.

  • अशा प्रद्धतीने स्टोर केलेल्या मिरच्या महिनाभर देखील फ्रिजमध्ये ताज्या राहतील.

हे देखिल वाचा

how to store green chilli for long time
Green Chilli : हाय हाय मिरची; हिरवी मिरची खाण्याचे आश्चर्यकारक फायदे

खाद्य तेलाच्या मदतीनं मिरची ठेवा ताजी

मिरची फ्रिजमध्ये ताजी रहावी यासाठी तुम्ही स्वयंपाकासाठी वापरत असलेल्या तेलाचा वापर करू शकता. ही देखील मिरची स्टोर करण्याची अगदी सोपी पद्धत आहे.

यासाठी धुवून स्वच्छ केलेल्या मिरच्या एका किचन नॅपकिनवर पसरून त्या कोरड्या कराव्या. या पद्धतीतही मिरच्यांची देठं काढून टाकावी आणि खराब किंला लाल झालेल्या मिरच्या वेगळ्या कराव्या.

त्यानंतर एक हवा बंद डबा घेऊन त्यात मिरच्या ठेवा. आता यावर एक मोठा चमचा तेल ओता. त्यानंतर हाताने मिरच्या हळूवार मिस्क करा. सर्व मिरच्यांना तेल लागेल अशी काळजी घ्या. मिरच्या जितक्या असतील त्या प्रमाणात तेल घेणं गरजेचं आहे.

एकंदरचं सर्व मिरच्यांना तेल लागणं गरजेचं आहे. त्यानंतर हा डबा बंद करून फ्रिजमध्ये ठेवा. अशा प्रकारे मिरच्या जवळपास महिनाभर फ्रिजमध्ये एकमद ताज्या राहतील.

मिरचीची पेस्ट करा स्टोअर

मिरचीची पेस्ट करून ती फ्रिजमध्ये ठेवल्यास केवळ महिनाभरचं नव्हे तर ३-४ महिने चांगली राहू शकते. त्यामुळे जर तुम्हाला जास्त महिन्यांसाठी स्वयंपाकासाठी मिरची स्टोर करायची असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे. मात्र ही पेस्ट तयार करताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.

  • मिरचीची पेस्ट तयार करण्याआधी मिरच्या स्वच्छ धुवून त्या कोरड्या कराव्या.

  • मिरच्या पूर्णपणे कोरड्या होणं या पद्धतीत अत्यंत गरजेचं आहे.

  • त्यानंतर मिरचीची देठं काढून टाका.

  • मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या टाका.

  • त्यानंतर त्यात साधारण एक चमचा मीठ घाला. मिरच्या जास्त असल्यास मीठ जास्त टाका.

  • साधारण १०० ग्रॅम मिरच्यांसाठी १ चमचा मीठ घ्या.

  • त्यानंतर लहान अर्धा चमचा हळद टाका.

  • मीठ आणि हळद प्रिझर्व्हेटिव्हचं काम करतात त्यामुळे पेस्ट जास्त दिवस टिकते.

  • त्यानंतर मिरचीची पेस्ट करा. पेस्ट करताना पाणी टाकू नका.

  • तसचं ही पेस्ट अगदी मुलायम करू नका. थोडी भरड ठेवा.

  • त्यानंतर ही पेस्ट हवाबंद डब्यामध्ये ठेवून डबा फ्रिजमध्ये ठेवा

  • मिरचीची पेस्ट फ्रिजमध्ये २-३ महिने टिकते.

  • अशा प्रकारे वेगवेगळ्या ट्रिक्स वापरुन तुम्ही मिरची फ्रिजमध्ये स्टोर करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.