Hyderabadi Green Chicken: संडे स्पेशल हैदराबादी ग्रीन चिकन कसे तयार करायचे?

मग ते ग्रील्ड चिकन असो की चिकन करी किंवा मसाला चिकन किंवा चिली चिकन, या पदार्थांचा आस्वाद मांसाहारी प्रेमी मोठ्या थाटामाटात घेतात.
Hyderabadi Green Chicken
Hyderabadi Green ChickenEsakal
Updated on

Hyderabadi Green Chicken: मांसाहार प्रेमींच्या आवडत्या खाद्यपदार्थात चिकनचा समावेश नेहमीच केला जातो. लोकांना चिकनसारखे विविध प्रकारचे पदार्थ शिजवून खायला आवडतात. मग ते ग्रील्ड चिकन असो की चिकन करी किंवा मसाला चिकन किंवा चिली चिकन, या पदार्थांचा आस्वाद मांसाहारी प्रेमी मोठ्या थाटामाटात घेतात.

जर तुम्हाला चिकनसोबत काही वेगळे ट्राय करायचे असेल तर तुम्ही हैदराबादचे खास चिकन ट्राय करू शकता. हैदराबादच्या बिर्याणीसोबत हैदराबाद ग्रीन चिकनही खूप प्रसिद्ध आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने घरी बनवू शकता. त्याची खास रेसिपी आम्ही तुमच्यासाठी शेअर करत आहोत.

साहित्य

● अर्धा किलो चिकन

● एक वाटी हिरवी कोथिंबीर

● एक कप पुदिन्याची पाने

● एक चमचा मेथी दाणे

● दोन ते तिन हिरव्या मिरच्या

● पाच ते सहा काजू

● दही

● तेल

● एक तमालपत्र

● एक वेलची

● दोन चमचे आले-लसूण पेस्ट

● 1 चमचा गरम मसाला

● 1 चमचा लाल तिखट

● 1 चमचा धने पावडर

Hyderabadi Green Chicken
Recipe: अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा खाऊ गल्ली मिळतो तसेच ‘रगडा चाट’

कृती

हैदराबादी ग्रीन चिकन बनवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला कोथिंबीर, पुदिना, मेथी दाणे, हिरव्या मिरच्या, काजू आणि दही याची मिक्सर मध्ये टाकून पेस्ट तयार करावी लागेल. आता ही पेस्ट चिकनच्या तुकड्यांवर मॅरीनेट करायची आहे.

नंतर एका कढईत तेल टाकुन तेल गरम झाल्यावर त्यात तमालपत्र, दालचिनी, वेलची, आले आणि लसूण घाला आणि परता. आता त्यात चिरलेला कांदा घाला.

कांदा चांगला भाजून झाल्यावर त्यात प्री-मॅरिनेट केलेले चिकन घालून शिजू द्यावे.

थोड्या वेळाने गरम मसाला, लाल तिखट, मीठ, धनेपूड आणि काळी मिरी पावडर घालून मिक्स करा.

आता त्यात थोडे पाणी घालून शिजवा. शिजल्यावर त्यावर हिरवी कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.

Related Stories

No stories found.