उन्हाच्या कडक झळा सुरू झाल्या आहेत. या दिवसांमध्ये आइस्क्रीम, कुल्फी कोन खाण्याची मज्जाच वेगळी असते. दुपारी किंवा रात्री जेवण झाल्यावर अनेक लोकांना आईस्क्रीम खायला आवडते. तर अनेक लोक घरीच आईस्क्रीम बनवतात आणि खातात. तुम्ही घरीच कुरकुरीत आईस्क्रीमचा कोन बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊया कोन बनवण्याची सोपी रेसिपी
आईस्क्रीम कोन बनवण्यासाठी लागणारे साहित्य (Material)
2 चमचे साखर
2 चमचे बटर
1/4 कप दूध
1/4 व्हॅनिला इसेन्स
1/4 कप मैदा
आईस्क्रीम कोन बनवण्याची कृती (Recipe)
कोन बनवण्यासाठी सर्वात आधी एका भांड्यातपिठी साखर आणि बटर मिक्स करावे.
चांगले मिक्स झाल्यानंतर त्यात दूध मिक्स करावे.
या मिश्रणात व्हॅनिला इन्सेस आणि मैदा मिक्स करा.
नंतर ते मिश्रण वेफल कोन मशीनमध्ये ठेवावे आणि दोन्हा बाजूने बेक करावे.
कोन सोनेरी झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढा आणि लगेच आईस्क्रीम कोन शेपमध्ये गुंडाळून कोनचा आकार द्यावा.
थंड झाल्यावर त्यात आईस्क्रीम टाकून आस्वाद घेऊ शकता.
कोन बनवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या
कोनच्या मिश्रणात कोणत्याही घटकाचे प्रमाण वाढवू किंवा कमी करू नका. कारण कोन नरम होऊ शकतात.
वेफल कोन मेकरमधून कोन काढल्यानंतर लगेच शेपरच्या साहाय्याने कोन बनवा. अन्यथा कोनचा आकार येणार नाही.
मिश्रण वॅफल मशीनमध्ये टाकण्यापूर्वी चांगले फेटावे. यामुळे कोन खराब होणार नाही.
आईस्क्रीम कोन कसे स्टोअर करावे?
कोन बनवल्यानंतर हवाबंद काचेच्या डब्ब्यात ठेवावे.
स्टोअर केलेल्या कोन नरम झाले असतील तर मायक्रोवेव्हमध्ये थोडा वेळ गरम करू शकता.
(Know how to store ice cream cones)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.