Monsoon Diet: पावसाळ्यात भूक भागवण्यासाठी भाग्यश्रीने शेअर केली हेल्दी स्नॅक्स रेसिपी, पाहा व्हिडिओ

Bhagyashrees Shares Healthy Cheela: पावसाळ्यात गरम चहा आणि पकोडे खाण्याची इच्छा होते पण वजन वाढण्याची भिती असेल तर भाग्यश्रीने सोशल मिडियावर शेअर केलेली आरोग्यदायी रेसिपी नक्की ट्राय करू शकता.
Bhagyashrees Healthy  Cheela
Bhagyashrees Healthy CheelaSakal
Updated on

Bhagyashrees Shares Healthy Cheela: पावसाळ्यात गरम चहासोबत पकोडे, भजे,समोसा, बटाटा वडा यासारखे पदार्थ खाण्याची मज्जाच असते. पण तेलकट पदार्थ खाल्याने वजन वाढण्याची चिंता असते. पण अभिनेत्री भाग्यश्रीने तिच्या कुकींग डायरीमधून सोशल मिडियावर आरोग्यदायी रेसिपी शेअर केली आहे. भाग्यश्रीने नाचणीचा चिला कसा बनवावा हे सांगितले आहे. हा पदार्थ बनवणे सोपे असून आरोग्यदायी आहे.

नाचणी चिल्ला बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • नाचणीचे पीठ

  • तांदळाचे पीठ

  • हळद

  • लाल तिखट

  • धणे पावडर

  • पुदीना पावडर

  • बडीशेप

  • जिरे

  • मीठ

  • पुदीना

  • दही

  • बारिक चिरलेला हिरवी मिरची

  • बारिक चिरलेला कांदा

  • बारिक चिरलेली शिमला मिर्ची

  • बारिक चिरलेला टोमॅटो

  • तेल

  • पनीर/चीज

Bhagyashrees Healthy  Cheela
Morning Breakfast: सकाळी नाश्त्यात बनवा चवदार अन् पौष्टिक ज्वारीचा पराठा, जाणून घ्या सोपी रेसिपी

नाचणी चिल्ला बनवण्याची कृती

नाचणीचा चिला बनवण्यासाठी सर्वात आधी दोन चमचे तांदळाचे पीठ नाचणीच्या पिठात मिक्स करावे. नंतर त्यात हळद, तिखट, धने पावडर, बडीशेप, जिरे आणि मीठ टाकावे आणि सर्व चांगले मिक्स करून घट्ट पेस्ट बनवावी. आता पिठात दोन चमचे दही, हिरवी मिरची, कोबी, कांदा, सिमला मिरची आणि टोमॅटो घाला आणि चांगले मिक्स करावे. एक तवा घ्या त्यावर तूप किंवा तेल लावून चिला बनवावा. दोन्ही बाजून चांगले खरपुस भाजावे. सर्व्ह करण्यापूर्वी पनीर खिसून टाकू शकता. हा चिला हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.