Jamnagar Street Food : बिल गेट्स यांची डॉलीसोबत चाय पे चर्चा झाली, विदेशी पाहुण्यांसाठी 'हे' आहेत जामनगरमधले टपरी ऑप्शन

Jamnagar Famous Street Food : गुजरातमधील प्रसिद्ध शहर अशी ओळख असणाऱ्या जामनगरमध्ये खाद्यपदार्थांची देखील रेलचेल पहायला मिळते.
Jamnagar Street Food
Jamnagar Street Foodesakal
Updated on

Jamnagar Street Food : गुजरातमधील जामनगर (Jamnagar) हे शहर सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. हे शहर चर्चेत येण्यामागचे कारण म्हणजे अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांचे प्री-वेडिंग फंक्शन. या प्री-वेडिंग फंक्शन्सला जामनगरमध्ये नुकतीच सुरूवात झाली आहे. या सोहळ्याला बॉलिवूडसहीत हॉलिवूडचे कलाकार, जगभरातील प्रसिद्ध उद्योगपती, नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत.

गुजरातमधील प्रसिद्ध शहर अशी ओळख असणाऱ्या जामनगरमध्ये खाद्यपदार्थांची देखील रेलचेल पहायला मिळते. आज आम्ही खास तुमच्यासाठी जामनगरच्या गल्लीमध्ये मिळणाऱ्या प्रसिद्ध स्ट्रीट फूड्सबद्दल जाणून घेणार आहोत. कोणते आहेत हे स्ट्रीटफूड्स? चला तर मग जाणून घेऊयात.

Jamnagar Street Food
Street Food in Lakshadweep : लक्षद्वीपमध्ये फिरायला गेल्यावर 'या' अनोख्या स्ट्रीट फूड्सचा आस्वाद घ्यायला विसरू नका

कटका ब्रेड

जामनगरमधील सर्वात प्रसिद्ध असलेल्या स्ट्रीट फूड्समध्ये या कटका ब्रेडचा समावेश आहे. ब्रेड चाट म्हणून ही या कटका ब्रेडला ओळखले जाते. हा कटका ब्रेड चिंचेच्या चटणीमध्ये बुडवला जातो. त्यासोबत उकडलेले बटाटे, मसालेदार शेंगदाणे, डाळिंब आणि चटणीसोबत सर्व्ह केला जातो.

यावर वरून कोथिंबीरने छान सजावट केली जाते. हा कटका ब्रेड खायला अतिशय चविष्ट लागतो. उरलेल्या ब्रेडपासून ही रेसिपी खास करून बनवली जाते. जामनगरच्या गल्लोगल्लीमध्ये हा पदार्थ हमखास मिळतो. (Katka Bread)

घुघरा

जामनगरमध्ये मिळणाऱ्या सुप्रसिद्ध स्ट्रीट फूड्समध्ये या घुघरा डिशचा सर्वात वरचा क्रमांक लागतो. येथे भेट देणारा प्रत्येक पर्यटक ही डिश चाखल्याशिवाय जात नाही. भारतातील घरोघरी बनवल्या जाणाऱ्या करंजीसारखा हा प्रकार आहे. मात्र, या करंजीचे स्टफिंग सर्वात वेगळे आहे, त्यामुळे, तर हा पदार्थ चविष्ट लागतो.

घुघरा बनविण्यासाठी कणीक मळली जाते. त्यानंतर, पांढरे वाटाणे, उकडलेला बटाटा, आले-लसणाची पेस्ट, कांदा आणि मसाल्यांच्या मिश्रणाचे स्टफिंग बनवले जाते. त्यानंतर, यापासून करंजी बनवली जाते आणि तेलात खमंग तळली जाते.  त्यानंतर, या घुघऱ्यावर चटणी, मसालेदार शेंगदाणे आणि शेव घातली जाते. हा मसालेदार पदार्थ चवीला अतिशय भन्नाट लागतो. (Ghughra)

मेसूब किंवा मसुबू

गुजरातमध्ये मिळणारा हा गोड पदार्थ अतिशय प्रसिद्ध आहे. जामगनरमध्ये ही स्वीट डिश चवीने खाल्ली जाते. म्हैसूर पाकप्रमाणे हा मेसूब पदार्थ बेसनापासून आणि देशी तूपापासून बनवला जातो. हा गोड पदार्थ कुरकुरीत लागतो. त्यामुळे, याची चव वेगळीच लागते. विशेष म्हणजे हा गोड पदार्थ बेसन व्यतिरिक्त शेंगदाणे किंवा उडीद डाळ बनवून ही बनवला जातो. जामनगरमध्ये गेल्यावर या गोड पदार्थाचा आस्वाद घ्यायला विसरू नका. (Mesub)

Jamnagar Street Food
Street Foods In Ayodhya : राम मंदिराच्या दर्शनाला जाताय ? फक्त अयोध्येतच चाखता येतील 'हे' खास स्ट्रीट फूड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.