No Suagr No jaggery Fasting Kheer Recipe: श्रावणात अनेक सणांची रेलचेल असते. अलिकडेच नागपंचमी, रक्षाबंधन यासारखे अनेक सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरे करण्यात आले. आता गोकुळाष्टमीची सर्वत्र जल्लोषात तयारी आहे. यंदा २६ ऑगस्टला हा सण साजरा केला जाणार आहे. वैदिक पंचांगानुसार, भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा केला जातो. हिंदू धर्मात श्रीकृष्ण जन्माष्टमीला खास महत्व आहे. या दिवशी श्रीकृष्णाची पूजा आणि उपवास केला जातो. भारतात श्रीकृष्ण जन्माष्टमीचे आणि गोपाळकाल्याचे खास महत्व आहे.
तुम्हीही उपवास करत असाल तर साखर आणि गुळाचा वापर न करता उपवासाची चवदार खीर बनवू शकता. ही खीर बनवणे खुप सोपी असून चवदार देखील आहे. ही खीर बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि बनवण्याची पद्धत काय आहे हे जाणून घेऊया.