सगळं घर आवडीनं खातील कारल्याची भाजी अशा काही टिप्स; कारले खाण्याचे फायदे

तुम्हाला जर का कारल्याचा कडूपणा कमी करायचा असेल तर बिया काढून कारले शिजवा.
bitter melon
bitter melonEsakal
Updated on

तुम्हाला माहिती का की कारल्याचा सर्वाधिक कडूपणा हा त्यांच्या बियांमध्ये असतो. तुम्हाला जर का कारल्याचा कडूपणा कमी करायचा असेल तर बिया काढून कारले शिजवा. कारल्याचे फायदे सर्वांनाच माहीत आहेत. पण फक्त खायला कडू आहे म्हणून घरातील मंडळीही कारलं खायला टाळा टाळ करतात. बहुगुणी कारलं फक्त त्यांच्या कडूपणामुळे अनेकांच्या आवडत्या खाद्यपदार्थांच्या यादीतून बाहेर पडतो. कारले चवीला कडू असले तरी त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. यामुळे त्वचा केवळ चमकत नाही तर रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

पण जर तुमच्या घरातील लोकांनी कारल्याच्या गुणधर्माचा फायदा घ्यावा आणि ते चवीने खावे असे वाटत असेल तर तुम्ही त्याचा कडूपणा दूर करण्याचा प्रयत्न करू शकता. अशाच काही टिप्स ज्यांच्या मदतीने कारल्याचा कडूपणा घालवता येईल आणि त्यातील पोषक तत्वांचा पुरेपूर फायदा घेऊ शकता.

या टिप्स वापरून कारल्याची भाजी तयार करु शकता.

● कारल्याचा कडूपणा त्यांच्या बियांमध्ये सर्वाधिक असतो. त्यामुळे त्याचा कडूपणा कमी करायचा असेल तर बिया काढून शिजवा. रस बनवताना बिया काढल्यानंतर कारल्याचा वापर करा त्यामुळे त्याला कडू चव लागणार नाही किंवा खूप कमी लागेल.

bitter melon
Recipe: स्वादिष्ट दम आलू भाजी कशी तयार करावी?

● मीठ कारल्याचा कडूपणा पूर्णपणे काढून टाकू शकते. किंबहुना, मिठातील खनिजे कारल्याचा कडू रस काढून टाकतात. कारल्याला मीठ लावून 20 ते 30 मिनिटे ठेवा. असे केल्याने सर्व कडू रस बाहेर येईल. याशिवाय कारले सोलून शिजवून घ्या. यामुळे अधिक कडूपणा जाणवणार नाही

● कारल्याचा कडूपणा दूर करण्यासाठी तुम्ही दही देखील वापरू शकता. यासाठी कारल्याचे छोटे तुकडे करून तासभर दह्यात ठेवा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हे दही भाजीमध्ये वापरू शकता.

● कारल्याला तळून घेतल्यानेही कडवटपणा दूर होतो.कारल्याचे छोटे तुकडे करून तांदळाच्या पाण्यात ठेवा. या पाण्यात किमान अर्धा तास भिजवून ठेवा. असे केल्याने कारल्याचा कडूपणा कमी होतो. कारल्याचा कडूपणा दूर करायचा असेल तर त्यात साखर किंवा गूळही टाकता येईल.

bitter melon
Green chilli thecha recipe: महाराष्ट्रीयन पद्धतीने झनझनीत हिरव्या मिरचीचा ठेचा कसा तयार करायचा ?

आता कारले (bitter melon) खाण्याचे फायदे बघू या..

● कारल्याचा रस प्यायल्याने आपले यकृत बळकट होतच, त्याचबरोबर यकृताचे सर्व त्रास बरे होतात. दररोज नियमाने हे घेतल्यास एका आठवड्यात चांगले परिणाम दिसून येतात. कावीळ मध्ये देखील हे फायदेशीर आहे.

● कारल्याची पाने किंवा फळाला पाण्यात उकळवून प्यायल्याने, रोग प्रतिकारक शक्ती वाढते, आणि कुठल्याही प्रकाराचे संसर्ग झाल्यास बरे होतात.

● उलट्या, जुलाब, किंवा कॉलरा झाला असल्यास कारल्याचा रसात काळंमीठ टाकून प्यायलास लगेच आराम मिळतो. जलोदर झाला असल्यास देखील दोन चमचे कारल्याचा रस पाण्यामध्ये टाकून प्यायल्याने फायदा होतो.कारल्यामध्ये फास्फोरस मुबलक प्रमाणात आढळतं.

● हे कफ, बद्धकोष्ठता आणि पचनासंबंधी समस्या दूर करतं. कारल्याचा सेवनाने अन्नाचे पचन व्यवस्थित होते. तसेच भूक सुद्धा मोकळेपणाने लागते.

● दम्याचा त्रास असल्यास कारलं खूपच फायदेशीर ठरतं. या आजारात कारल्याची भाजी काही ही मसाले ना वापरता देखील भाजी बनवून खाल्याने फायदेशीर ठरतात.

● पोटात गॅस बनत असल्यास आणि अपचनामध्ये कारल्याच्या रस घेणे चांगलेच असते, जेणे करून आपल्यापासून हे आजार लांबच राहतं.कारल्याचा कडूपणा दूर करायचा असेल तर त्यात साखर किंवा गूळही टाकता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.