इटालियन,फ्रेंच नाहीतर बेबोला आवडतो हा देसी पदार्थ, आंबा अन् लिंबूच्या लोणच्यासोबत मारते ताव

करिनाच्या घरच्यांना चायनीज पदार्थ आवडतात पण सैफ आणि तिला देसी पदार्थ आवडतात.
 kareena kapoor favorite food
kareena kapoor favorite food
Updated on

प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर म्हणजेच सगळ्यांची लाडकी बेबो सध्या तिच्या खासगी गोष्टींमुळं अधिकत चर्चेत असते. सैफ अली खानशी लग्न केल्यानंतर करीना मोजक्याच चित्रपटात दिसली. त्यामुळं करीना आपल्या आयुष्यातील बहुतांश वेळ आपल्या कुटुंबासोबत आणि मुलांसोबत घालवत असल्याचे पाहायला मिळतं. तिचं अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलं होत असतात.

असाच एक करिनाचा आणि रणबीर कपूरचा व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये करिना तिच्या आवडिच्या डिशबद्दल सांगताना दिसत आहे. व्हायरल होणारा हा व्हिडीओ मे महिन्यातील आहे.

 kareena kapoor favorite food
Moong Dal Toast Recipe : नाश्त्यासाठी बनवा टेस्टी आणि हेल्दी 'मूग डाळ टोस्ट', ही आहे सोपी रेसिपी

यावेळी रणबीर तिला घरचं जेवण आवडत का असा सवाल उपस्थित करतो. यावेळी करिना म्हणते की, घरी बहुतांश चायनीच फुड पसंद करता पण मला आणि सैफला खिचडी खुप आवडते. खिचडी सोबत आंब्याच किंवा लिंबूच लोणचं खायला अधिक आवडत.

 kareena kapoor favorite food
Ribbon Rice Recipe: डाळ-भाताचा कंटाळा आला असेल तर बनवा स्वादिष्ट असा रिबन राईस

तर जाणून घेऊयात बेबोला आवडणारी खिचडी कशी करायची?

साहित्य

२५० ग्राम तांदूळ

५० ग्राम मुगडाळ

1 बटाटा

1 कांदा

1/2 टोमॅटो

२/३ लसूण

कोथिंबीर

४/५ कडीपत्ता पाणे

३/४ हिरव्या मिरच्या

1 टीस्पून जिरे, हळद, लाल तिखट

चवीनुसार मीठ

तेल किंवा तुप

पाणी

 kareena kapoor favorite food
Corn Appe Recipe: नाश्त्यासाठी बनवा टेस्टी 'कॉर्न आप्पे', ही आहे सोपी रेसिपी..

कृती

प्रथम तांदुळ आणि मुगडाळ धुवून घ्या. त्यानंतर गॅसवर कुकर ठेवा त्यामध्ये तेल किंवा साजूक तुप घाला. तेल किंवा तुप चांगले गरम झाले असता त्यामध्ये जिरे व कडीपत्ता टाकून चांगले तडतडू द्या. थोड्यावेळाने त्यात मिरची घालून चांगले परतून घ्यावे. परतून झाल्यावर त्यात लसूण, कांदा, टोमॅटो, कट केलेला बटाटा एकजीव होईपर्यंत चांगले परतुन घ्या. नंतर त्यात हळद, लाल तिखट घाला.

हे सर्व एकजीव झाल्यानंतर तांदूळ व मुगडाळ कुकर मध्ये टाकुन चांगले भाजून घ्यावे. भाजल्यावर त्यात पाणी घालावे.

पाणी टाकून झाल्यानंतर त्यात मीठ व कोथिंबीर घालून एक उकळी आल्यावर झाकण लावून ४/५=शिट्ट्या काढाव्या. मग तयार झाला तुमचा खिचडी भात. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या लोणच्यासोबत ही खिचडी सर्व्ह करु शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com