ढोकळा हा भारतातील गुजरात प्रांतांमधील एक शाकाहारी पदार्थ आहे. ढोकळा सकाळी नाश्त्याच्या वेळेपासून अगदी जेवणाप्रमाणे सुद्धा खाल्ला जातो. ढोकळा हा खमण नावाने सुद्धा ओळखला जातो. दोन्ही नावे वापरली जातात.चला तर मग आज आपण पाहू या गुजराती ढोकळा कसा तयार करायचा याची खास रेसिपी...
● साहित्य
1) एक वाटी बेसन पीठ
2) अर्धा वाटी रवा
3) लिंबू सत्व
4) दही
5) हळद
6) मीठ
7) आल मिरची पेस्ट
8) तेल
9) अर्धा चमचा बेकिंग सोडा
10) फोडणीचे साहित्य
11) अर्धा चमचा मोहरी
12) हिंग
13) कढीपत्ता पाने
14) दोन हिरवी मिरची
15) साखर
16) अर्धा वाटी पाणी
कृती:
एका बाऊल मध्ये आल हिरवी मिरचीची पेस्ट टाकावी नंतर दही आणि साखर घालुन त्यात थोडे पाणी घालून चांगले हलवावे.
आता बेसन पीठ आणि रवा एकत्र करावे आणि त्यात हे तयार पाणी हळूहळू घालत हलवावे.
या पिठात गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्यावी.
नंतर या पिठात लिंबू पिळून घ्यावे तसेच हळद घालून घ्यावी. हळद ही ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालेल
तेल घालून हे पिठाचे मिश्र बिटरने चांगले चार ते पाच मिनिटं हलवत रहावे. आणि थोडा वेळ तसेच ठेवून द्यावे. सर्वात शेवटी सोडा घालून पुन्हा एकदा हलवावे. आणि प्लेट मध्ये ट्रान्स्फर करावे. ट्रान्स्फर केले की प्लेट हलकच जमीनीवर अपटावी जेणेकरून त्यातले बबल बाहेर पडतील.
गॅसवर कढईत पाणी गरम करत ठेवावे त्यात स्टॅन्ड ठेवावे त्यावर प्लेट ठेवून 20 मिनिट झाकण ठेवून शिजू द्यावे.
ढोकळा शिजेपर्यंत फोडणी तयार करावी.
फोडणी साठी एका पातेल्यात तेल गरम करत ठेवावे आता यात मोहरी, हिंग, कढीपत्ता, मिरची घालून फोडणी करावीफोडणी तयार झाली की त्यात पाणी घालून घ्या.पाण्यात साखर, आणि लिंबू रस घालून हलवावे. साखर विरघळेपर्यंत. नंतर गॅस बंद करावा.ढोकळा वीस मिनिटात तयार होतो तेव्हा गॅस बंद करावा आणि तसाच झाकण न उघडता पाच मिनिटं ठेवावा.
नंतर ढोकळा हलकेच सुरीने बाजूने सोडवून घ्या. दुसऱ्या प्लेटमध्ये काढून खालच्या बाजूने ही थंड होऊ द्या. सुरीने वड्या कापून घ्यावे. मस्त स्पाॅन्जी होतो.तयार फोडणी चमचाने ढोकळा भिजेल अशी सोडावी. किमान पाच मिनिटं तरी तसेच मुरू द्यावे फोडणी. कोथिंबीर, ओल खोबरे घालून सर्व्ह करावे. या सोबत चिंच गुळाची चटणी नाही घेतली तरी चालेल पण आवडत असल्यास घ्यावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.