KHAVA GAJAR BURFI : नवीन वर्षाच्या स्वागताला घरच्या घरी तयार करा खवा गाजर बर्फी..

गाजराची कोशिंबीर, कच्च गाजर, गाजराचा हलवा, गाजराच्या वड्या असे अनेक प्रकार तयार केले जातात
Carrot burfi
Carrot burfiEsakal
Updated on

Carrot Benefits: थंडीमध्ये बाजारात अगदी सहज उपलब्ध होणारं कंदमुळ म्हणजे गाजर. बीटा कॅरेटीनचं प्रमाण गाजरामध्ये अधिक असतं. अनेक पोषक तत्वांसह अ जीवनसत्त्वानं परिपूर्ण असलेलं गाजर थंडीच्या दिवसांमध्ये तरी नक्की खावं. गाजराची कोशिंबीर, कच्च गाजर, गाजराचा हलवा, गाजराच्या वड्या असे अनेक प्रकार तयार केले जातात. परंतु नुसतं गाजर रोज खाल्ल्यानं आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढते आणि वेगवेगळ्या धोकादायक आजारांपासून आपल्याला दूर राहण्याची क्षमता वाढते. आजच्या लेखात आपण नवीन वर्षाच्या स्वागताला घरच्या घरी तयार करा खवा गाजर बर्फी कशी तयार करायची याची सविस्तर रेसिपी...

साहित्य

अर्धा किलो गाजर

दूध चार कप

साखर सव्वा कप

तूप चार चमचे

वेलचीपूड

ड्रायफ्रूटस

मिल्क पावडर एक वाटी

Carrot burfi
Winter Recipe: पारंपरिक पद्धतीने कच्चा पेरूची आरोग्यवर्धक भाजी कशी तयार करायची?

कृती:

सर्वप्रथम गाजर स्वच्छ धुवून किसून घ्यावे (गाजराचा मधला भाग पिवळसर असेल तर फक्त बाजूचे लाल गाजर किसून घ्या मधला भाग घेऊ नका आणि जर मधला भाग थोडा लालसर असतो ते पूर्ण किसा) मंद गॅसवर पॅनवर दुध व तूप घालून मिक्स करा नंतर मिल्क पावडर घालून चांगल ढवळा, गुठळ्या होऊ देऊ नका. आळत आलं की गॅस बंद करून मिश्रण डिशमध्ये काढावे. थंड झाल्यावर याचा खवा तयार होईल तो मस्त हाताने मळून घ्यावा.

पॅनवर दोन तूप घालून त्यात गाजराचा किस परतून घ्यावादूध घालून झाकण ठेवून शिजवून घ्यावे. मिश्रण आळलं की त्यात साखर काजूचे तुकडे घालून मोठ्या आचेवर शिजवा. जळणार नाही याची काळजी घ्यामिश्रण पूर्णपणे सुकलं की वेलचीपूड घालाताटाला तूप लावून त्यात हे मिश्रण थापा व वरून खवा घालून नंतर वड्या पाडून घ्याव्यात. बर्फीवर पिस्त्याचे काप घालून बर्फी सर्व्ह करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.