Gulabjamun: सणावारांना करा लुसलुशीत घरच्या घरी खव्याचे गुलाबजाम

आज आम्ही तुम्हाला खव्याचे गुलाबजामून कसे करणार आहोत, असे सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
गुलाब जामून
गुलाब जामूनसकाळ
Updated on

सध्या सणांचा सीजन सुरू आहे. त्यामुळे सगळीकडे उत्सव साजरा करण्याची लगबग सुरू आहे. अशातच सणांचा सीजन म्हटलं की गोडधोड पदार्थ खाणे साहजिकच आहे. याच पार्श्वभूमीवर आज आम्ही तुम्हाला खव्याचे गुलाबजामून कसे करणार आहोत, असे सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

गुलाब जामून
Food: पारंपरिक तुरीचं वरण डाएट करतानाही विसरू नका; तुरीचं वरण खाण्याचे 5 फायदे

साहित्य -

  • २५० ग्रॅम खवा

  • ४ टेस्पून मैदा

  • २ टेस्पून रवा

  • साखर १ मोठी वाटी

  • पाणी १ मोठी वाटी

  • वेलची पूड

  • तेल/तूप तळणीसाठी

  • चिमूटभर खाण्याचा सोडा

  • रोज इसेन्स

गुलाब जामून
Food: पारंपरिक तुरीचं वरण डाएट करतानाही विसरू नका; तुरीचं वरण खाण्याचे 5 फायदे

कृती -

1. सर्वप्रथम खवा मऊ असल्यास हातानेच मळून घ्यावा त्यामध्ये मैदा, रवा, वेलची पूड सोडा मिसळून चांगले मळून घ्यावा.

2. आता तयार मिश्रणाच्या लहान लहान गोळे करुन मंद आचेवरतेलात तळून काढावे.

3. एका भांड्यामध्ये साखर आणि पाणी एकत्र करून पाक करून घ्यावा.

4. पाक झाला की गॅस बंद करा आणि त्यामधे रोज इसेन्स घाला. त्यानंतर तळून घेतलेले गोळे त्या पाकात सोडा. हे गुलाबजाम २-३ तास चांगले मुरण्यासाठी ठेवा

6. अशाप्रकारे लुसलुशीत घरच्या घरी खव्याचे गुलाबजाम तयार होणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.