Kitchen Budget : महागड्या भाज्यांनी गडबडलंय किचनचं बजेट? मग या टेस्टी अन् हेल्दी रेसिपी ट्राय करा
किचमध्ये कायम असणाऱ्या या पदार्थांनी बनवा टेस्टी भाज्या
Kitchen Budget : सध्या भाजीच्या किंमती सगळीकडे झपाट्याने वाढल्या असून सर्वसामान्य गृहिणीचा किचनचा बजेट मेंटेंन करणे कठीण झाले आहे. टोमॅटोचे दरांनी मागल्या काही महिन्यात उंची गाठली आहे तर ढोबली मिर्ची, कोबी आणि पावटा आणि रोजच्या वापरातील भाज्यांचे दरही तुलनेत वाढले आहे.
अशात सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसतो. तुमचा किचना बजेट तुम्हाला पूर्वीप्रमाणेच मेंटेन करायचा असेल तर तुम्ही या काही कमी खर्चात बनणाऱ्या भाज्या ट्राय करू शकता.
महागड्या भाज्या न घेता तुमच्या बजेटमध्ये बसणाऱ्या या भाज्या ट्राय करा
कुरडईची भाजी
बऱ्याच जणांकडे उन्हाळ्यात कुरडई बनवून त्याला व्यवस्थित वाळवून डब्यात साठवून ठेवतात. तुम्ही कुरडईची भाजी बनवू शकता.
कुरडईची भाजी बनवण्यासाठी आधी कुरडई व्यवस्थित भिजेपर्यंत पाण्यात घालून ठेवा. नंतर कढईत भाजीच्या गरजेप्रमाणे तेल घालून त्यात कांदा फोडणी घाला आणि तिखट, मीठ, आल्याची पेस्ट आणि हळद टाकून थोडे परता आणि त्यात कुरडई घाला. आता ही भाजी काही वेळ शिजू द्या. तुमची कुरडईची भाजी तयार आहे.
आमटी
ही आमटी चवीला टेस्टी अन् चटपट बनणारी आहे. तुम्ही चपातीचे पीठ मळताना अगदी किंचीत कणीक बाजूला काढून ठेवा. त्यानंतर या कणकीचे थोडे पाणी टाकून दूध काढा. त्यानंतर कढईत तेल टाकून त्यात कांदा आणि बारीक कापलेल्या लसणाची फोडणी द्या.
घरी असल्यास मेथी दाणेही घाला. आणि तेलात हे सगळं थोडं शिजल्यानंत त्यात कणकीचे काढलेले दूध घाला. काही वेळ त्याला शिजू द्या. तुमची आमटी तयार आहे. (Food)
मोकळे बेसण ( मोकळं पिठलं)
ही भाजीसुद्धा फार सोपी आहे. तुम्ही चण्याच्या दाळीचे पीठ (बेसण) तेलात हलके भाजून घ्या. शक्य नसल्यास नाही भाजले तरी चालेल. दोन कांदे उभे काप करून व्यवस्थित कापून घ्या. मिर्चेसुद्धा बारीक कापा. आणि कढईत तेल घालून कांदे, मिर्चे फोडणी घाला आणि व्यवस्थित शिजू द्या.
कांदे सोनेरी झाले की त्यात चण्याच्या दाळीचे पीठ घाला आणि त्याता व्यवस्थित परतून घ्या. पिठाच्या गुठल्या होता कामा नये. त्यासाठी इतर भाजीपेक्षा थोडे जास्तीचे तेल घाला. त्याला काहीवेळ शिजू. अगदी ५-१० मिनिटांत तुमचं पीठलं बवून तयार होईल. (Recipe)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.