टोमॅटोचे दर सध्या वाढू लागले आहेत. पण भाजीत टोमॅटो नसेल तर भाजी एकतर घट्ट होत नाही, किंवा त्याला चव येत नाही. अशावेळी टोमॅटो टाळून भाजी चविष्ट कशी करता येईल, असा प्रश्न घराघरात पडला असेल. याचंच उत्तर मुंबईतल्या दोन शेफनी शोधून काढलं आहे.
टोमॅटोला पर्याय काय? या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे मुंबईचे शेफ जसलीन मारवाह यांनी जसलीन रोगन जोश आणि राजमा हे दोन पदार्थ टोमॅटोचा वापर न करता बनवतात. त्या सांगतात की, दही हा एक चांगला पर्याय आहे. दही प्रत्येक घरात आढळतं. टोमॅटोचं काम पदार्थाला थोडासा आंबटपणा देण्यास आणि पदार्थाची चव वाढवणं असतं. हे काम दही सुद्धा करू शकतं.
टोमॅटोचा वापर न करता रोगन जोश बनवण्याची रेसिपीही जसलीन सांगतात. या रोगनमध्ये कांदा, टोमॅटो किंवा लसूण काहीही वापरलेलं नाही. दह्याच्या वापरामुळे ग्रेव्ही करता येते आणि थोडासा आंबटपणाही त्याला येतो. राजमासुद्धा अशाच पद्धतीने दह्याचा वापर करून बनवता येतो. कश्मिरी मिरची पावडर, दही आणि मेथी पूड राजमामध्ये वापरता येते.
काय आहे ही रेसिपी?
राजमा
साहित्य –
पाव किलो राजमा
१ तमालपत्र
१ दालचिनीचा तुकडा
४-५ लवंग
५ हिरवे वेलदोडे
चवीनुसार मीठ
तडक्यासाठी
मोहरीचं तेल
चिमूटभर हिंग
२ चमचे काश्मिरी लाल मिरची पावडर
२/3 कप दही
२ चमचे धने पावडर
पाव चमचा सुंठ
अर्धा चमचा काश्मिरी टिक्की मसाला
कृती –
तमालपत्र, दालचिनी, लवंग, वेलदोडे सगळं घालून राजमा शिजवून घ्या. चवीनुसार मीठ घाला. त्यानंतर मोहरीच्या तेलामध्ये हिंग, काश्मिरी लाल मिरची पावडर आणि दही टाका. या मिश्रणाला तेल सुटेपर्यंत हलवत राहा. त्यानंतर यामध्ये शिजवलेला राजमा घाला यामध्ये धने पावडर, सुंठ आणि काश्मिरी टिक्की मसाला घाला.
रोगन जोश
साहित्य –
१ किलो मटण
१०-१२ चमचे मोहरीचं तेल
थोडंसं हिंग
१ तमालपत्र
५ वेलदोडे
२ मिरे
१ दालचिनी
४-५ लवंग
२-४ चमचे काश्मिरी लाल मिरची पावडर
४०० ग्रॅम दही
चवीनुसार मीठ
अर्धा चमचा आले पूड
२ चमचे धने पावडर
३-४ कप पाणी
कृती –
खडे मसाले आणि हिंग टाकून त्यात मटण टाकून मोहरीच्या तेलात परतून घ्या. त्यामध्ये काश्मिरी लाल मिरची पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करा. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला. त्यात २०० ग्रॅम दही टाका आणि शिजवून घ्या. थोड्या वेळानंतर आणखी २०० ग्रॅम दही टाका आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्या. यामध्ये धने पावडर आणि सुंठ पावडर टाका. यामध्ये तीन ते चार कप पाणी टाका आणि कुकरला शिजवून घ्या.
सध्या बाजारामध्ये टोमॅटोची किंमत ४० रुपये प्रति किलोवरून ५०, ६० रुपयांपर्यंत गेली आहे. काही ठिकाणी तर टोमॅटोने ७० रुपये गाठले आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.