स्वयंपाक घरात अनेक प्रकारची भांडी असतात. यात स्वयंपाक Cooking शिजवण्यासाठी आपण विविध प्रकारच्या धातूंची भांडी वापरतो. किचनमध्ये खास करून ऍल्युमिनियम, स्टील किंवा लोखंडाच्या भांड्यांचा जास्त वापर होतो. Kitchen Tips in Marathi Which Utensils to be used for Cooking
यातही अलिकडे कास्ट आयर्न म्हणजे बिडाची भांडी आणि विविध ऩॉनस्टिक आणि टॅफलॉन कोटेड भांडी Utensils बाजारात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. विविध पदार्थ बनवण्यासाठी अनेकजण ही भांडी वापरतात.
स्वयंपाक Cooking करत असताना ते अधिक आरोग्यदायी बनवण्यासाठी तुम्ही कोणते जिन्नस वापरता आणि ते कश्या प्रकारे बनवता याबरोबरच ते कोणत्या भांड्यामध्ये शिजवता हे देखील महत्वाचं आहे. आपण्या ज्या भांड्यांमध्ये पदार्थ शिजवतो किंवा ठेवतो त्या धातूचे गुणधर्म त्या पदार्थांमध्ये उतरत असतात. यासाठीच स्वयंपाकाची भांडी ही देखील आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा घटक आहे.
स्वयंपाकासाठी कोणत्या धातूची भांडी अधिक उत्तम आहेत. तसचं त्याचे फायदे आणि तोटे याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
चांदी- चांदी हा एक अत्यंत थंड धातू आहे. जर तुम्ही चांदीच्या पात्रामध्ये भोजन करत असाल तर यामुळे तुम्हाच्या शरीराला आतून थंडावा मिळतो. यामुळे शरीर शांत राहत. चांदीच्या भांडयामध्ये स्वयंपाक केल्याने आणि जेवणासाठी वापरण्याने मेंदू तल्लख होतो.
यामुळे डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते. शिवाय चांदीच्या पात्रात जेवण केल्याने पित्तदोष, वायु आणि कफदोष नियंत्रणात राहण्यास मदत होते. खास करून चांदीच्या ग्लासात पाणी आणि दूध प्यायल्यास चांगला फायदा होतो.
हे देखिल वाचा-
लोखंडी भांडी- लोखंडी कढई किंवा तव्यामध्ये स्वयंपाक केल्याने आरोग्याला फायदेशीर ठरतं. यामुळे शरीराची शक्ती वाढते. लोखंडाच्या भांड्यांमधील स्वयंपाकामुळे शरीरातील लोहाची कमतरता भरून निघण्यास मदत होते. यामुळे अनेक आजारांपासून दूर राहता येत. लोखंडाच्या भांड्यातील जेवणामुळे शरीरात सूज येण कमी होत. तसचं कुष्ठरोग आणि काविळीचा धोका कमी होतो.
मात्र लोखंडाची भांडी वापरताना काही गोष्टींची दखल घेणं गरजेचं आहे. लोखंडी भांड्यात पदार्थ शिजवल्यानंतर ते लगेचच इतर भांड्यात काढावे. तसचं जेवण वाढण्यासाठी लोखंडी भांड्यांचा वापर करू नये. यामुळे बुद्धी कमी होवू शकते आणि मेंदूची क्षमता कमी होवू शकते.
स्टील- घराघरांमध्ये मोठ्या प्रमाणात स्टीलची भांडी आढळून येतात. सध्या बाजारातही स्टीलच्या भांड्यांना मोठी मागणी आहे. स्टीलच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करणं योग्य नसल्याचं अनेकजणांचा समज असतो. मात्र हा समज चुकीची आहे.
स्टीलची भांडी नुकसानदायक नसतात. कारण ती गरम किंवा थंड अशा कोणत्याच प्रभावाची नसल्याने त्याचे आरोग्यवर विपरीत परिणाम होत नाहीत. असं असलं तरी स्टीलच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक केल्याने आरोग्यासाठी कोणताही फायदा होत नाही तसचं नुकसानही होत नाही. safest cookware for health
अॅल्युमिनियम- अनेक घरांमध्ये मोठ्या प्रमाणात ऍल्यूमिनियमच्या भांड्याचा वापर केला जातो. ही भांडी किमतीने कमी असतात. शिवाय जाड आणि यात पदार्थ करपण्याची शक्यता कमी असते. ऍल्यूमिनियम बॉक्साइडने बनलेलं असतं. मात्र अॅल्यूमिनियमच्या भांड्याचा वापर स्वयंपाकासाठी करणं अत्यंत घातक ठरू शकतं.
हे आरोग्यासाठी अगदी अयोग्य आहे. आयुर्वेदानुसार अॅल्यूमिनियम आयरन आणि कॅल्शियम सोशून घेतं. अॅल्यूमिनियमच्या भांड्यामधील पदार्थ खाल्ल्याने हाडं कुमकुवत होतात. मानसिक आजार होतात. त्याचसोबत लिव्हर आणि नर्व्हस सिस्टीमवर त्याचा वाईट परिणाम होतो. Non-Toxic Cookware
त्याचसोबत किडनी निकामी होणं, टीबी, दमा आणि शुगर अशा अनेक आजारांचा धोका वाढतो. अॅल्यूमिनियमच्या प्रेशर कुकुरमध्ये पदार्थ शिजवल्याने त्यातील ८७ टक्के पोषक तत्व नष्ट होतात. त्यामुळे अॅल्यूमिनियमचा वापर स्वयंपाकासाठी करणं योग्य नाही.
हे देखिल वाचा-
मातीची भांडी- मातीची भांडी हा एकमेव असा पर्याय आहेत ज्यामुळे कोणतही नुकसान होत नाही तर अनेक फायदे मिळतात. स्वयंपाकासाठी मातीची भांडी वापरल्यास अनेक आजार दूर होवू शकतात. मातीच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करताना जरी थोडा जास्त वेळ लागत असला तरी जेवण चविष्ट तर होतचं शिवाय त्यात अनेक पोषक तत्व असतात.
खास करून दूध आणि दूग्धजन्य पदार्थांसाठी मातीच्या भांड्याचा वापर फायदेशीर ठरतो. मातीच्या भांड्यांचा स्वयंपाकासाठी वापर केल्यास १०० टक्के पोषक तत्व शरीराला मिळतात. त्यामुळे मातीची भांडी हा स्वयंपाकासाठी सगळ्यात उत्तम पर्याय आहे. best cookware for health
एकूण स्वयंपाक करताना त्यासाठी कोणतं भांडं वापरावं याकडे आता लक्ष देण गरजेचं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.