काही वेळा स्वयंपाकघरात ठेवलेले कांदे लवकर फुटून त्यांना कोंब येतात.
घरातील स्त्रिया अनेकदा बटाटे (Potatoes), कांदे (Onion) यांसारख्या भाज्या जास्त खरेदी करून स्वयंपाकघरात (Kitchen) ठेवतात. कारण हे दोन्ही घटक जवळपास प्रत्येक भाजी (Vegetables) बनवण्यासाठी वापरले जातात. पण काही वेळा स्वयंपाकघरात ठेवलेले कांदे लवकर फुटून त्यांना कोंब येतात. जर तुमच्यासोबतही असे होत असेल, तर कांद्याला कोंब येण्यापासून रोखण्यासाठी या सोप्या किचन हॅक्स फॉलो करा.
इतर भाज्यांसोबत कांदा ठेवू नका
अनेकजण बटाटा-कांदा, लसूण-आले इत्यादी भाज्या एकत्र मिसळून ठेवतात. तुमच्याकडूनही अशी चूक होत असेल तर असे करणे टाळा. वास्तविक, अनेक भाज्यांमध्ये इथिलीन (Ethylene)नावाचे रसायन असते, त्यामुळे कांद्याला कोंब येऊ लागतात. याशिवाय कांदे फळांमध्ये मिसळून कधीही ठेवू नयेत.
कागद (Paper) वापरा
कांद्याला कोंब येण्यापासून रोखण्यासाठी कागदाचा वापर करा. कांदा कागदात गुंडाळून ठेवल्याने लवकर कोंब फुटत नाही. कांदा कागदात किंवा पाकिटात ठेवल्यानंतर थंड जागी ठेवा.
फ्रीजमध्ये (Fridge) ठेवू नका
अनेक वेळा लोक कांदा साठवण्यासाठी फ्रीजचा वापर करू लागतात. तुम्हीही असेच काही करत असाल तर अशी चूक करू नका. फ्रीजमध्ये ठेवलेल्या बाकीच्या गोष्टींमुळे कांदे लवकर फुटू लागतात. इतकेच नाही तर काही वेळा कांदा फ्रीजमध्ये ठेवल्याने शुगर लेव्हल (Sugar level)वाढते, ज्यामुळे कांदा लवकर फुटतो.
कांदा प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये ठेवू नका
कोंब येऊ नये म्हणून कांदा प्लास्टिकच्या (Plastic) ताटात कधीही ठेवू नका. प्लॅस्टिकच्या पिशवीत कांदे ठेवल्याने ते लवकर गरम होतात आणि अंकुर फुटू लागतात. कांद्याला कोंब येऊ नये म्हणून कापसाचे कापड पसरून त्यावर कांदा ठेवा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.