इडली मऊ,लुसलुशीत होत नाही? मग फॉलो करा सिक्रेट टिप्स

 kitchen tips how to make soft and spongy idli
 kitchen tips how to make soft and spongy idli
Updated on

शनिवार-रविवार जवळ येऊ लागला की सगळ्यांना आठवड्याच्या सुट्टीचे वेध लागतात. या दोन दिवसांमध्ये घरातील कुटुंबीय विविध प्लॅन आखतात. या प्लॅनमध्ये जेवणाच्या मेन्यूपासून ते फिरायला जाण्याच्या बेतापर्यंत सगळ्याचा समावेश असतो. परंतु, या सगळ्यात गृहिणींची मात्र दमछाक होते. सुट्टीचा दिवस असल्यामुळे घरातल्या प्रत्येकाला जेवणात किंवा नाश्त्यामध्ये नवीन आणि वेगळा पदार्थ हवा असतो. त्यामुळे मग अनेकांच्या घरी मिसळपाव, बटाटे वडे, इडली चटणी, पावभाजी असे पदार्थ होतात. यात अनेकदा इडली करतांना पीठ व्यवस्थित भिजत नाही. परिणामी, इडली घट्ट, जाड किंवा निब्बर होते. त्यामुळे मग ही इडली खाण्यासाठी घरातले टाळाटाळ करतात. परंतु, अशी इडली टाळण्यासाठी आणि मऊ, लुसलुशीत इडली करण्यासाठी काही सोप्या टीप्स आणि ट्रिक्स आहेत. या टीप्स फॉलो केल्या तर अगदी बाहेर मिळणाऱ्या इडलीप्रमाणेच तुमचीही इडली सॉफ्ट आणि स्पॉंजी होईल.

१.  इडली करतांना कधीही पॉलिश केलेली उडदाची डाळ वापरु नका. डाळ पॉलिश केल्यामुळे त्यातील आवश्यक असणारे बॅक्टेरिया नष्ट होतात. हे बॅक्टेरिया पीठ आंबण्यासाठी आवश्यक असतात.

२. इडली करण्यासाठी तांदूळाऐवजी तांदळाचा रवा वापरा.

३. उडदाची डाळ स्वच्छ धुवून घ्या.

४. पाण्याचं प्रमाण अचूक असणे गरजेचे.

५. इडलीच्या पीठात काळं मीठ किंवा खडे मीठ घाला.

६. खायचा सोडा घातल्यास इडलीचं पीठ चांगलं आंबवलं जातं.

७. इडली कधीही वाफवतांना १० ते १५ मिनिटांच्या वर ठेवू नये. जास्त वेळ वाफ दिल्यास ती कडक होऊ शकते.

८. इडलीसाठी डाळ व तांदूळ भिजवतांना त्यात थोडे मेथी दाणे घालावेत.

९. पीठ तयार झाल्यावर एकाच बाजूने चांगलं फेटून घ्या.

१०. इडली पात्रामध्ये ठेवण्यापूर्वी इडली पात्रात पाणी टाकून ते छान गरम करुन घ्या.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.