Daal Chataka Recipe : आजाराने तोंडाची चव गेलीय, ताटाची रंगत वाढवतील हे पदार्थ, रेसिपी आहे सोपी

Healthy Recipe : तुम्ही जेवणाच्या पानात वाढण्यासाठीचे ज्यादाचे पदार्थ बनवू शकता. जे तुमच्या तोंडाची गेलेली चव परत आणतील.
Daal Chataka Recipe
Daal Chataka Recipeesakal
Updated on

Healthy Recipe :

सध्या अनेक व्हायरल आजार होत आहेत. हे आजार होऊन गेले की तोंडाची चव कडवट झालेली असते. आजारपणातील औषधांमुळे तोंड कडवट झालेले असते. कितीही खाल्लं तरी तोंडाला चव नसल्याने जेवल्यासारखेच वाटत नाही.

अशावेळी काही पारंपरिक पदार्थ तुमच्या मदतीला धावून येऊ शकतात. आजारपणात पोषण मिळेल अशा पदार्थांचे सेवन करावे. तुम्ही ताटाला लावण्यासाठीचे ज्यादाचे पदार्थ बनवू शकता. जे तुमच्या तोंडाची गेलेली चव परत आणतील. (Healthy Recipe)

Daal Chataka Recipe
Healthy Breakfast Recipe : मुलं मेथीची भाजी खायला करतात टाळाटाळ, मग त्यांना द्या हा पौष्टीक अन् खमंग नाष्टा

यामध्ये डाळीचा चटका, मुळाचा चटका आणि उडदाच्या डाळीचे डांगर यांचा समावेश आहे. अगदी कमी वेळात तुम्ही हे पदार्थ बनवू शकता. जे तुमच्या जेवणाची रंगत वाढवतील.

डाळीचा चटका

साहित्य -

अर्धी वाटी हरभरा डाळ भिजत घालावी. अर्धा टी स्पून जिरे, ५ ते ६ हिरव्या मिरच्या, ४ ते ५ लसूण पाकळ्या, मूठभर चिरलेली कोथिंबीर, अर्धी वाटी दही, १ टे. स्पून तेलाची हिंग, हळद, मोहरी घालून केलेली फोडणी.

कृती :

- भिजवलेली हरभरा डाळ निथळून घ्यावी त्यात हिरवी मिरची, जिरे, लसूण, कोथिंबीर, मीठ, साखर चवीनुसार घालून चटणी वाटावी. फार बारीक वाटू नये. वाटलेल्या चटणीला दही घालून सरबरीत कालवावे. वरून एक टे. स्पून तेलाची फोडणी द्यावी.

वरील चटक्यात एक ताजा मुळा किसून घालून मुळ्याचा चटका करावा. मुळा घातल्यास लसूण घालू नये.

Daal Chataka Recipe
Corn Dosa Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा कुरकुरीत कॉर्न डोसा, जाणून घ्या रेसिपी

मुळ्याच्या चटका

साहित्य -  

अर्धी वाटी हरभरा डाळ भिजत घालावी, १ पांढरा कोवळा मुळा साल काढून किसून घ्यावा, ३ ते ४ हिरव्या मिरच्या, पाव चमचा जिरे, थोडी कोथिंबीर, १ वाटीभर साय काढलेल्या दुधाचे दही

कृती :

भिजवलेली हरभरा डाळ निथळून घ्यावी त्यात हिरवी मिरची, जिरे, कोथिंबीर, मीठ घालून डाळ वाटून घ्यावी, फार बारीक वाटू नये.

वाटलेल्या डाळीत किसलेला मुळा व दही घालून चटणी कालवावी. (३) आवडत असल्यास १ टी स्पून तेलाची मोहोरी, हळद, हिंगाची फोडणी द्यावी.

Daal Chataka Recipe
Morning Breakfast Recipe: घरीच झटपट बनवा शिंगाड्याच्या पिठाचा पौष्टिक हलवा, जाणून घ्या रेसिपी

उडदाचे डांगर

साहीत्य

१ भांडे उडदाची डाळ, १ भांडे हरभरा डाळ, १ टी स्पून जिरे, १ मोठा कांदा बारीक चिरून, १ टी स्पून लाल तिखट, चवीनुसार मीठ, १ चमचा तेल, मोहरी, हिंग, १ वाटी दही.

कृती

उडदाची डाळ व हरभरा डाळ १ टी स्पून जिरे घालून भरड दळून घ्यावी. वरील दळलेला भरडा अर्धी वाटी घ्यावा. त्यात बारीक चिरलेला कांदा, तिखट, मीठ, दही घालून कालवावे. आवडत असल्यास अर्धा टी स्पून साखर घालावी. वरून तेलाची मोहरी, हिंग घालून फोडणी द्यावी व मग कालवावे.

(संबंधित रेसिपी सौ.जयश्री देशपांडे यांच्या हमखास पाककृती या पुस्तकातून घेण्यात आल्या आहेत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.