Kobichya Vadya Recipe: चवदार अशा कोबीच्या वड्या कशा तयार करायच्या?

ताटात कोणती ना कोणती ‘वडी’ असल्याशिवाय महाराष्ट्रीयन थाळी पूर्ण होतंच नाही.
Kobichya Vadya Recipe
Kobichya Vadya RecipeEsakal
Updated on

रोज रोज पोळी-भाजी खाऊन आपल्याला कंटाळा येतो. जेवताना आपल्याला सोबत काही ना काही तोंडी लावायला हवंच असतं. त्यातल्या त्यात ‘वडी’ हा प्रकार महाराष्ट्रीयन पारंपरिक थाळीमधील सर्वात महत्वाचा प्रकार आहे. ताटात कोणती ना कोणती ‘वडी’ असल्याशिवाय महाराष्ट्रीयन थाळी पूर्ण होतंच नाही. आतापर्यंत तुम्ही कोथिंबीर वडी, अळू वडी खाल्ली असेल पण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय कोबीच्या वड्या. कोबीपासून अनेक पदार्थ बनवले जातात.

काहींना कोबी खायला आवडते तर काहींना नाही. कोबीची भाजी, कोबीची भजी, कोबीचे पराठे, अशा व अनेक प्रकारचे पदार्थ कोबीपासून बनवले जातात. कोबी हे फायबर, फोलेट, पोटॅशियम, मॅग्नेशियम, जीवनसत्त्वे ए आणि के तसेच इतर अनेक पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. कोबी रोगप्रतिकारशक्ती सुधारते. त्यात संत्र्यापेक्षा जास्त व्हिटॅमिन सी आढळते. ही भाजी कच्ची, सॅलडच्या स्वरूपात आणि अगदी सूपच्या स्वरूपातही खाल्ली जाते.चला तर मग आजच्या लेखात पाहु

Kobichya Vadya Recipe
Adhik Mahina 2023: धोंडाच्या महिन्यात जावयाला चांदीचे वाण का देतात? 

साहित्य

अर्धा कोबी

कोथिंबीर

मीठ

तीळ

जिरं पावडर

धणे पूड

ओवा

बेकिंग सोडा

हळद

लाल तिखट

ज्वारीचं पीठ

बेसन

तांदळाचं पीठ

आलं - लसूण - मिरची पेस्ट

तेल

Kobichya Vadya Recipe
Adhik Maas 2023: छत्रपती संभाजीनगर मध्ये गाजतीय चक्क 'धोंडा स्पेशल थाळी', काय आहे स्पेशल ?

कृती:

सर्वप्रथम, कोबी किसून किंवा बारीक चिरून घ्या. त्यात कोथिंबीर, मीठ, तीळ, जिरं पावडर, धणे पूड, ओवा, बेकिंग सोडा, हळद, लाल तिखट घालून मिश्रण मिक्स करा. आता त्यात ज्वारीचं पीठ, बेसन, तांदळाचं पीठ, मिक्स करा. शेवटी आलं - लसूण - मिरची पेस्ट आणि तेल घालून मिश्रण मळून घ्या.

Kobichya Vadya Recipe
Ranbhaji Recipe : पाथरीची सुकी भाजी कशी तयार करायची?

आता हातावर तेल लावा, आणि मळलेल्या पीठाचे लांब गोळे तयार करून घ्या. आता हे गोळे एका भांड्यात किंवा इडली पात्रात चाळण ठेऊन चांगले वाफवून घ्या. वडे चांगले शिजले की नाही हे तपासण्यासाठी त्यावर चमचा किंवा टूथपिक घालून चेक करा.आता वडी एका प्लेटमध्ये काढून घ्या. थंड झाल्यानंतर त्याचे काप करून घ्या. एकीकडे पॅन गरम करत ठेवा. त्यात तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात वडी तळून घ्या. अशा प्रकरे, कोबीचे खमंग वडी खाण्यासाठी रेडी. आपण या वड्यांचा आस्वाद चहा अथवा जेवणासोबत घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()