कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा असेही म्हणतात. शरद पौर्णिमा हा पवित्र सण आज 16 ऑक्टोबर रोजी साजरा होत आहे. शरद पौर्णिमेसाठी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची पौर्णिमा तिथी असणे आवश्यक आहे. या दिवशी पवित्र नदीत स्नान करून दान केल्याने पुण्य प्राप्त होते.
याशिवाय शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाशात दूध अन् खीर ठेवण्याची परंपरा आहे. चंद्राची सावली पडलेले दूध,खीर सेवन केल्याने आरोग्यासाठी अनेक फायदे होतात, अशी मान्यता आहे.
कोजागिरीसाठी संपूर्ण कुटूंब, मित्रमंडळी एकत्र येऊन ती साजरी करतात. यावेळी मसालेदुधाचा बेत असतो. जर तुम्हीही यावेळी दुधाची तयारी करत असाल. तर दुधापासून तयार होणाऱ्या काही सोप्या रेसिपी तुम्ही आज नक्की ट्राय करायला हव्यात.
साहित्य :
२५० ग्रॅम पनीर, २ लिटर दूध, १ चमचा कॉर्नफ्लोअर, १ सपाट वाटी साखर, वेलदोडा पूड अथवा केवडा इसेन्स
कृती :
विकतचे पनीर असेल तर ते खात्रीच्या दुकानातून ताजे आणावे ताजे पनीर पांढरेशुभ्र दिसते. शिळे पनीर पिवळट दिसते. पनीर घरी करायचे असल्यास १ लिटर दूध उकळी आल्यावर २ टे. स्पून व्हाईट व्हिनीगर घालून फाडावे.
मलमलच्या फडक्यावर घालून त्यावर वजन ठेवावे. पाटा ठेवल्यास उत्तम, पाणी पुरते निघाले पाहिजे. ४ ते ५ तासात पनीर होते. एक लिटर उत्तम स्निग्धांश असलेल्या दूधाचे पाव किलो पनीर होते.
पनीरचे छोटे छोटे चौकोनी तुकडे करावेत. २ लिटर दूध आटवावे १ चमचा कॉनफ्लोअर लावून घट्ट होईपर्यंत निम्मे आटवावे. साखर घालून एक उकळी येऊन साखर विरघळली की खाली उतरवून गार करावे. गार झाल्यावर पनीरचे तुकडे, केवडा इसेन्स घालून फ्रीजमध्ये गार करून सर्व्ह करावी.
पनीरचे तुकडे करण्याऐवजी जाड बटाटे किसण्याच्या किसणीवर किसून घातले तरी खीर मिळून येते. दूध गरम असताना पनीर मिसळू नये. सजावटीला गावठी गुलाबाच्या पाकळ्या घालाव्यात ही खीर बंगाली लोकांमध्ये करतात.
साहित्य -
५ कप साय काढलेले दूध, अर्धी वाटी कोणतेही सुवासिक तांदूळ, कृत्रिष मोही आणणारा पदार्थ, ५ ते ६ थेंब केवडा इसेन्स, थोडे बदामाचे काप व पावठी गुलाबाच्या पाकळ्या