हेल्दी रेसिपी : लंगरवाली दाल

Langarwali-Dal
Langarwali-Dal
Updated on

खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासात त्या-त्या प्रांतातील पीक-पाणी, हवामानाबरोबरच तेथील विविध समाज, समुदाय, त्यांची संस्कृती यांचाही विचार करावा लागतो. महाराष्ट्रात इतर प्रांतातून येथे येऊन स्थायिक झालेले अनेक समाज-समुदायही आहेत. शीख समाज हा त्यांपैकीच एक.

परप्रांतातील इथे स्थायिक झालेले समाज व इथले मूळचे रहिवासी यांच्यात सांस्कृतिक गोष्टींचे आदान-प्रदान झाले, तर काही ठिकाणी यातून नवीनच काही सांस्कृतिक चालीरीती जन्मास आल्या. असे असले तरी त्यांचे पिढ्यान्‌ पिढ्या चालत आलेले रीतिरिवाज, संस्कृतीचेही हे लोक आनंदाने जतन करतात. गुरुद्वारांमध्ये चालणारे ‘लंगर’ हे याचेच द्योतक आहे. सर्व स्तरातील जाती-पंथांच्या लोकांनी एकत्रित भोजन घ्यावे, सेवा, दान या संकल्पनेतून शेकडो वर्षांपूर्वी सुरू झालेले ‘लंगर’ आजही सर्वत्र याच पवित्र भावनेने सुरू आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उल्हासनगर व नांदेड येथील गुरुद्वारा भेटींत हे सर्व जवळून पाहता आले. देशभरातील गुरुद्वारांमधून रोज हजारो-लाखो लोक लंगरमध्ये अन्नग्रहण करीत असतात व असे असूनही या स्वयंपाकात किंवा व्यवस्थापनात कधीच गडबड-गोंधळ होत नाही. गुरुद्वारांतील स्वयंपाकघर, स्वच्छता, अचूक व्यवस्थापन हे सर्वच अचंबित करणारे होते.

इथल्या स्वादिष्ट ‘डाळीची’ व ‘कडा प्रसाद’ची रेसिपी सांगाल, या प्रश्‍नावर उत्तर मिळते, ‘‘देखो जी, वैसे तो इसमें सिंपलसीही चीजें पडती है, दाल और कुछ मसाले. लेकीन ये लोग बडे प्यार और लगनसे ये प्रशाद बनाते है. उसकी वजह से ये प्रशाद इतना स्वादिष्ट बनता है!’’ आपल्याला अगदी सहजपणे हे लोक स्वादिष्ट भोजनाचे रहस्यच सांगून जातात. स्वयंपाकात इतर खाद्यपदार्थांबरोबरच प्रेमही महत्त्वाचे! शिवाय आजकाल चर्चेत असणारे ‘स्लो कुकिंग’ या स्वयंपाकाच्या जुन्या पद्धतीमुळेही लंगरमधील ही डाळ अत्यंत स्वादिष्ट होते.

गुरू नानक जयंतीनिमित्त माझ्या प्रवासाच्या आठवणीतील एक हेल्दी रेसिपी, ‘लंगरवाली दाल’. शिवाय हेमंत ऋतूत तिखट, कडू, आंबट रसाचे, उष्ण गुणांचे पदार्थ, तूप, दही, गहू, तीळ, उडीद अशा पदार्थांचे सेवन करणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असते. तेव्हा ही रेसिपी या ऋतूत नक्की बनविता येईल.

साहित्य 
उडीद डाळ सालीसकट, हरभरा डाळ, आले, मिरची, हळद, धने पावडर. फोडणी – तूप/तेल, जिरे, कांदा, टोमॅटो, लाल तिखट, हळद, मीठ, आले-मिरची-लसूण वाटण.

कृती
१) डाळी भिजवून आले, मिरची, हळद घालून एकत्रित मऊ शिजवणे.
२) शिजलेली डाळ चांगली घोटून घेणे.
३) फोडणी करून कांदा, टोमॅटो व उर्वरित साहित्य घालून परतणे.
४) डाळ, मीठ, पाणी घालून उकळी आणणे.

टीप - ही रेसिपी मंद आचेवर (स्लो कुकिंग) पद्धतीने शिजवण्याचा प्रयत्न करावा.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.