Paneer Tasty Recipe : डब्यासाठी रेसिपी शोधताय? आहो झटपट बनवा पनिरचे आप्पे

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच पनीरचे पदार्थ खूप आवडतात, शिवाय पनीर खाणे शरीरसाठीही लाभदायक आहे
Paneer Appe Tasty Recipe
Paneer Appe Tasty Recipeesakal
Updated on

Paneer Appe Tasty Recipe : पनीर ही एकमेव गोष्ट आहे जी प्रत्येकाला आवडते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच पनीरचे पदार्थ खूप आवडतात, शिवाय पनीर खाणे शरीरसाठीही लाभदायक आहे. यात अनेक पौष्टीक घटक आढळतात जसे की प्रथिने, फॉस्फरस, व्हिटॅमिन बी १२, कॅल्शियम, फोलेट, सोडियम, व्हिटॅमिन बी ६, झिंक, कॉपर.

Paneer Appe Tasty Recipe
Instant Breakfast Recipe : रोजच्या ब्रेकफास्टने कंटाळा आलाय; मग झटपट बनवा रवा पोहे डोसा

रक्त वाढण्यापासून ते हाडं मजबूत करण्यापर्यंत याचे फायदे अनेक आहेत. अनेक लोकं आपल्या रोजच्या नाश्त्यामध्ये पनीरचा वापर करतात. मुलांना डब्यासाठीही ही सुंदर रेसिपी आहे. तुम्ही कधी पनीरचे आप्पे खाल्ले आहेत का? बघूया याची रेसिपी.

Paneer Appe Tasty Recipe
Cooking Tips for Breakfast : असा बनवाल पराठा तर पीठ संपेल पण मन भरणार नाही!

साहित्य :

- किसलेले पनीर

- डाळीचे पीठ

- मीठ

- धणे पूड

- चिली फ्लेक्स

Paneer Appe Tasty Recipe
Gajar Halwa Recipe: असा बनवाल गाजरचा हलवा तर बोटं चाटत रहाल...

- जिरं पावडर

- तिखट

- बारीक चिरलेला कांदा

- बारीक चिरलेली हिरवी मिरची

- बारीक चिरलेली कोथिंबीर

- दही

- तेल

Paneer Appe Tasty Recipe
Samosa for Breakfast: इंग्रजांना कुकीज नाही तर चहासोबत आवडतोय आपला देसी समोसा, लंडनचा सर्व्हे

कृती :

- एका मोठ्या बाऊलमध्ये किसलेले पनीर घ्या.

- त्या पनीरमध्ये डाळीचे पीठ, मीठ, धणे पूड, चिली फ्लेक्स, जिरं पावडर, लाल तिखट, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, दही, घालून संपूर्ण मिश्रण चांगले मिक्स करा.

- हे मिश्रण पिठाच्या गोळ्यासारखं मळून घ्या. मिश्रण तयार झाल्यानंतर हातावर तेल घ्या आणि त्याचे गोल - गोल आप्पे तयार करून घ्या.

Paneer Appe Tasty Recipe
Healthy Breakfast Recipe : आपल्या आजीच्या पद्धतीने बनवा खास तांदळाची उकड

- आप्पे पॅनमध्ये तेल लावा.

- पॅन गरम झाल्यानंतर त्यात तयार पीठाचे गोळे ठेवा.

- आप्पेंना दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या. चमचा अथवा टूथ - पिकच्या मदतीने आप्पेंना दोन्ही बाजूने फिरवत राहा.

- आप्पे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्या.

Paneer Appe Tasty Recipe
Instant Breakfast Recipe : रोजच्या ब्रेकफास्टने कंटाळा आलाय; मग झटपट बनवा रवा पोहे डोसा

- आप्पे भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढा.

- तुमचे गरमा गरम टेस्टी पनीरचे आप्पे तयार आहेत यासोबत तुम्ही सॉस किंवा चटणी घेऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.