Low Calorie Modak Recipe : रोज रोज गोड खाऊन वाढेल शुगर, बाप्पाला दाखवा लो कॅलरीच्या मोदकचा नैवेद्य

आज आपण लो कॅलरी शुगर फ्री मोदकाची रेसिपी जाणून घेणार आहोत.
Low Calorie Modak Recipe
Low Calorie Modak Recipeesakal
Updated on

Low Calorie Modak Recipe : बाप्पाला दहा दिवस दहा वेगवेगळ्या प्रकारच्या मोदकांचा नैवेद्य दाखवण्याचा भक्तांचा अट्टाहास असतो. मात्र रोज गोड मोदक खाण्याचा तुमच्या आरोग्यावर तर वाईट परिणाम होणार नाही ना? याकडेही विशेष लक्ष द्यावे लागेल. तेव्हा आज आपण लो कॅलरी शुगर फ्री मोदकाची रेसिपी जाणून घेणार आहोत.

बाप्पाच्या आगमनानंतर दररोज बाप्पाच्या पूजेआधी त्यांना वेगवेगळ्या प्रकारचा नैवेद्य दाखवला जातो. आज आपण बाप्पाच्या नैवेद्यासाठी शुगर फ्री मोदक ट्राय करणार आहोत. जास्त गोड खाल्ल्यास शरीरातील कॅलरीजचे प्रमाण वाढू शकते. तेव्हा शुगर फ्री मोदक खाणे कधीही चांगले.

उकडीचे पारंपारिक मोदक

उकडीचे पारंपारिक मोदक आरोग्यासाठी चांगले असण्याबरोबरच वेट लॉस डाएट फॉलो करणाऱ्या लोकांसाठीही फायद्याचे आहेत.

क्रेनबेरी फ्लेवर्ड मोदक

मोदकाला गोड चव येण्यासाठी मोदकाच्या सारणात ड्राय फ्रूट्ससोबत ड्राय क्रेनबेरीती पेस्ट मिसळा. आता तांदळाच्या पिठाची कणीक मळून मोदकासाठी पातळ पात्या तयार करून त्यात सारण भरा. हे मोदक खायला टेस्टी असण्याबरोबरच आरोग्यासाठी देखील फार चांगले आहे.

Low Calorie Modak Recipe
Ukadiche Modak Recipe: बनवा माघी गणेश जयंती स्पेशल उकडीचे परफेक्ट मोदक

डार्क चॉकलेट मोदक

मोदकाच्या आतील सारण म्हणून डार्क चॉकलेट आणि ड्राय फ्रूट्स भरून मोदक तयार करा. हे मोदकसुद्धा खायला टेस्टी लागतात. (Recipe)

खजूर मोदक

नैसर्गिक गोड म्हणून तुम्ही खजूराचा वापर करू शकता. हे मोदक तुम्ही अगदी कमी वेळात तयार करू शकता. हे मोदक लो कॅलरीचे असून ते मुलांसाठी आणि मोद्यांसाठीसुद्धा आरोग्यदायी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.