Koshimbir Recipe: पावसाळ्यात तेलकट खाणे टाळा, ट्राय करा हेल्दी कोशिंबीर

आज आपण काकडी, गाजर आणि टोमॅटोची साधी कोशिंबीर जाणून घेणार आहोत
Koshimbir Recipe in Marathi
Koshimbir Recipe in Marathisakal
Updated on

Koshimbir Recipe: पावसाळ्यात फळभाज्या खाणे, आरोग्यासाठी खुप चांगले असते. उत्तम आरोग्यासाठी जेवणात तेलकट पदार्थ खाण्यापेक्षा कोशिंबीर खाणे कधीही चांगले. कोशिंबीरमध्ये असलेले प्रोटीन शरीराला पोषक अन्न देते. त्यामुळे डॉक्टरसुद्धा दररोजच्या जेवनात कोशिंबीर खावी, असा सल्ला देतात.

आज आपण काकडी, गाजर आणि टोमॅटोची साधी कोशिंबीर जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

Koshimbir Recipe in Marathi
Food Tips : या गोष्टी दह्यासोबत खाल्यास आरोग्यास धोका

साहित्य

  • २ गाजरं किसलेली

  • २ कोवळ्या काकड्या बारीक चिरलेल्या

  • १ मोठा टोमॅटो बिया काढून बारीक चिरलेला

  • थोडी कोथिंबीर बारीक चिरलेली

  • अर्धी वाटी डाळिंबाचे दाणे ऐच्छिक

  • १ टेबलस्पून दाण्याचं कूट

  • पाव टीस्पून तिखट

  • अर्धा टीस्पून साखर, मीठ चवीनुसार

  • फोडणी – २ टीस्पून तेल, मोहरी, पाव टीस्पून हिंग

Koshimbir Recipe in Marathi
Pregnancy Healthy Foods: गरोदरपणात हे अन्नपदार्थ आरोग्यासाठी असतात सकस

कृती –
१) सगळ्या भाज्या एकत्र करा. त्यात दाण्याचं कूट, तिखट, मीठ, साखर घाला. कोथिंबीर घाला. नीट एकजीव करा.
२) एका लहान कढलीत तेल गरम करा. त्यात मोहरी घाला.
३) ती तडतडली की त्यात हिंग घाला, लगेचच गॅस बंद करा. ही फोडणी कोशिंबिरीवर ओता.
या कोशिंबिरीबरोबर मी आज काळ्या वाटाण्याची आमटी, वांग्याचे काप, मेथीची भरडा भाजी, दोडक्याची भाजी केलं होतं. तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे हवं ते करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.