Chicken Tikka Pizza Recipe: बर्थडे बॉय एम एस धोनीला आवडतो चिकन पिझ्झा, जाणून घ्या रेसिपी

महेंद्र सिंह धोनी मांसाहारी आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण धोनी मांसाहर पदार्थांचा चाहता आहे.
mahendra singh dhoni favourite food Chicken Tikka Pizza recipe
mahendra singh dhoni favourite food Chicken Tikka Pizza recipe
Updated on

आज भारतीय क्रिकेट संघाचा आणि सर्वांचा आवडता माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी 43 वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावरुन त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. जगभरात धोनीचे लाखो चाहते आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही माहीची क्रेझ कमी झालेली नाही.

त्याचे चाहते त्याच्या प्रत्येक झलकसाठी उत्सुक असतात. त्याच्या खासगी गोष्टी जाणून घ्यायला प्रत्येकजण आतुर असतो. तर आज आम्ही तुम्हाला धोनीच्या आवडत्या पदार्थांची यादी सांगणारच आहोत पण त्यासोबत त्याची रेसिपीदेखील.

महेंद्र सिंह धोनी मांसाहारी आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण धोनी मांसाहर पदार्थांचा चाहता आहे. त्याला खाण्यात बटर चिकन, नान, कबाब, चिकन टिक्का पिझ्झा हे पदार्थ आवडतात. तर आज आपण चिकन टिक्का पिझ्झा घरी कसा बनवायचा याची रेसिपी जाणून घेणार आहोत.

mahendra singh dhoni favourite food Chicken Tikka Pizza recipe
Breakfast Recipe : साध्या पोह्यांपेक्षा इंदोरी पोहे कसे वेगळे? जाणून घ्या चटपटीत पोह्यांची सोप्पी रेसिपी

तर चिकन टिक्का पिझ्झा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

पिझ्झा बनवण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम बेस तयार करायला हवा, जर तुम्हाला तितका वेळ मिळत नसेल तर तुम्ही बेस बेकरीमधून विकत आणु शकता.

बेससाठी लागणारे साहित्य

दूध पावडर : ४ चमचे

साखर: 2 चमचे

यीस्ट: 1 ½ टीस्पून

कोमट दूध : १ कप

बटर / ऑलिव्ह ऑइल : १ टीस्पून – २ टीस्पून

mahendra singh dhoni favourite food Chicken Tikka Pizza recipe
Raita Masala Recipe: टिपिकल रायत्याला येईल नवी चव, पुदिन्याचा मसाला बनवा अन् स्टोअर करा

चिकन टिक्का बनवण्यासाठी साहित्य

चिकन : 450 ग्रॅम

आले लसूण पेस्ट: 1 टीस्पून

लाल मिर्च पावडर : २ टीस्पून

जिरे/जिरा पावडर: ½ टीस्पून

गरम मसाला : ¾ टीस्पून

कसुरी मेथी : ½ टीस्पून

जाड दही : ३-४ चमचे

लिंबाचा रस : १ चमचा

मीठ : १ टीस्पून

लाल रंग पर्यायी

तेल: ग्रिलसाठी

mahendra singh dhoni favourite food Chicken Tikka Pizza recipe
Jowar Appe Recipe : ज्वारीच्या पिठापासून झटपट बनवा चवदार अप्पे, एकदम सोपी आहे रेसिपी

टॉपिंग्जसाठी

टोमॅटो सॉस : ४ चमचे

आले लसूण पेस्ट: 1 टीस्पून

ऑलिव्ह ऑईल: 1 टीस्पून

ओरेगॅनो : 1 टीस्पून

पेपरिका : 1 टीस्पून

शिमला मिरची/ शिमला मिरची: 1 लहान

कांदा (पांढरा कांदा) : १

टोमॅटो : १ .

ओरेगॅनो : टॉपिंगसाठी

मोझारेला चीज : दीड कप किसलेले

चेडर चीज : १ कप किसलेले

कृती

सर्वात प्रथम चिकन मॅरिनेट करुन घ्या. चिकन टिक्का बनवण्यासाठी चिकनला मीठ, तिखट, जिरे पावडर, गरम मसाला पावडर, दही, कसुरी मेथी, लिंबाचा रस आणि लाल रंग घालून मॅरीनेट करा. 1 तास किंवा त्याहून अधिक काळ बाजूला ठेवा.

पॅनमध्ये तेल गरम करुन त्यात मॅरीनेटेड चिकन ५०% शिजवावे आणि थंड झाल्यावर एक एक चिकन तुकडा बांबू स्टिक्स् वर लावून स्टिक्स् रेडी कराव्यात. चिकन टिक्का भाजायला घेण्याआधी, गॅसवर फॉईल लावावी, म्हणजे गॅसचा सरफेस खराब होत नाही. आता तयार केलेल्या स्टिक्स् गॅसवर स्मोकी फ्लेवर येईपर्यंत, दोन्ही बाजूंनी भाजून घ्याव्यात.

mahendra singh dhoni favourite food Chicken Tikka Pizza recipe
Oregano Seasoning Recipe: पिझ्झा सोबत छोट्या पाकीटात मिळणारे ओरेगॅनो आता घरीच बनवा

पिझ्झा बेस कसा बनवाल

वाटी मध्ये तीन चार टेबलस्पून कोमट पाणी घेऊन त्यात, साखर, ड्राय ईस्ट घालून दहा मिनिटे झाकून ठेवावे.. दहा मिनिटांनंतर त्यामध्ये बुडबुड्या दिसतील. मैदा चाळून घ्यावा त्यात मीठ, रवा घालून मिक्स करावे.भिजवलेले ड्राय ईस्ट घालून हलक्या हाताने मिक्स करावे..व लागेल तसे गरम (कोमट) पाणी घालून चांगले मळून घ्यावे.. एक, दोन टेबलस्पून तेल घालून चांगले पाच सहा मिनिटे मळून घ्यावे.पीठाचा गोळा मऊसर झाला पाहिजे.

पीठाचा गोळा तेल लावून वाटी मध्ये एक, दोन तास गरम ठिकाणी झाकून ठेवावा. एक तासानंतर पीठ फुगून डबल होते.. सुका मैदा हातावर घेऊन पीठ दाबून घ्यावे म्हणजे त्यातील हवा निघून जाईल. मग परत मळून मऊ करावे. तयार पीठाचे चार भाग करून घ्यावेत.. एक भाग घेऊन हाताने फोल्ड करत गोळे बनवुन घ्यावे. चार भाग होतील. त्यातील एक भाग पोळी पाटावर घेऊन सुका मैदा लाऊन लाटून घ्यावे. लाटलेली पोळी डब्याच्या झाकणाने किंवा किनारीच्या ताटाने कापून घ्यावी. म्हणजे बेस ची किनार जाड होईल आणि आकार गोल होईल. बेसला फोकने छिद्र पाडून घ्यावेत म्हणजे भाजताना फुगणार नाही.

गॅसवर पॅन गरम करून गॅस बारीक करावा, पॅनमध्ये बटर पेपर ठेवून त्याला थोडेसे तेल लावून घ्यावे. पिझ्झा बेस बारीक गॅसवर च भाजायचे आहेत...बेस बटर पेपरवर घालून झाकण ठेवून एक मिनिट शिजू द्यावे व नंतर पलटी करून दुसरी बाजू ही भाजून घ्यावी. तुमचा पिझ्झा बेस तयार.

mahendra singh dhoni favourite food Chicken Tikka Pizza recipe
Bajra Idli Recipe: नाश्त्यात चविष्ट आणि हेल्दी खायचे आहे? मग बनवा बाजरीची इडली, पाहा रेसिपी!

टोमॅटो सॉस, ऑलिव्ह ऑईल, आले लसूण पेस्ट आणि ओरेगॅनो मसाला मिक्स करून पिझ्झा सॉस बनवा. तो सॉस पिझ्झा बेसला लावा. थोडे किसलेले चेडर चीज घाला आणि तंदुर करुन घेतलेले चिकनचे तुकडे, चिरलेला कांदा, सिमला मिरची आणि टोमॅटो बेसवर पसरवा. तसेच मॉझरिला चिजा टाका आणि पिझ्झा चांगला वाफवुन घ्या. प्रीहिटेड ओव्हनमध्ये 180 C वर 20 मिनिटे किंवा चीज वितळेपर्यंत आणि तपकिरी होईपर्यंत पिझ्झा बेक करा. तुमचा काही मिनिटातच पिझ्झा तयार होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.