bhogi Recipe : भोगी मकर संक्रांतीच्या अगोदरच्या दिवशी येतो तो सण म्हणजे भोगी, भोगी साजरी करण्याची वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी पद्धत आहे , भोगी हा सण महाराष्ट्रामध्ये वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. भोगीच्या दिवशी भोगीची भाजी प्रसिद्ध भाजी बनवली जाते मुळातच भोगी हा सण जानेवारी महिन्यात येत असल्यामुळे या महिन्यात थंडी जास्त पडलेली असते त्यामुळेच भोगीच्या भाजी मध्ये असलेले उष्णता गुणधर्म यामुळे आपल्या शरीराला उष्णता मिळण्यासाठी नक्कीच फायदा होतो .भीष्मांनी देहत्यागासाठी संक्रांतीचा म्हणजेच उत्तरायणाचा दिवस निवडला होता. भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये दक्षिणायनाच्या तुलनेत उत्तरायण अधिक पुण्यकारक असतं.
भोगी या सणाच्या दिवशी महिला सकाळी लवकर उठून अभ्यंगस्नान करतात देवदेवतांची पूजा करून सकाळी वरील पदार्थ म्हणजेच उस बोर रुदा पावटे वांगे याची भाजी बनवली जाते व या भाजीबरोबर बाजरीची भाकर ती तीळ लावून सुवासिनी स्त्रियांना ती भाजी खायला बोलवले जाते किंवा त्यांना त्यांच्या घरी दिली जाते माणसांच्या वागण्यामध्ये स्नेह आणि माधुर णा येण्यासाठी भोगी सण आज साजरा केला जातो असे म्हणतात "नखाई भोगी तू सदा रोगी" अशी एक म्हण प्रचलित आहे त्यामुळे भोगीच्या भाजी खाणे खूप गुणकारी समजली जाते. आजच्या लेखात आपण पाहणार आहोत भोगी स्पेशल शेंग सोलाण्याची भाजी खान्देशी पद्धतीने कशी तयार करायची याची सविस्तर रेसिपी..
विशेष करून ही भाजी हिवाळ्यात येणाऱ्या सर्व शेंगा एकत्र करून केली जाते म्हणून याला शेंग सोलण्याची भाजी असं म्हणतात. ही भाजी शिजवण्याची खास पध्दत आहे. या भाजीत जराही पाणी घालू नये. कढईच्यावर ताटावरती भरपूर पाणी ठेवावं. या पाण्याच्या वाफेत शिजलेली ही भाजी चविष्ट होते आणि दोन ते तीन दिवसही टिकते.
कृती:
सर्वप्रथम कढईत भरपूर तेल घ्यावं. ते तापवावं. मोहरी घालावी. आलं, जिरे, मिरचीचं भरडसर वाटण घालावं. नंतर गोडा मसाला आणि तो नसेल तर धने जिऱ्याची पूड घालावी. सर्व भाज्या घालाव्यात. फोडणीत भाज्या चांगल्या परतून घ्याव्यात. मीठ घालून भाजी पुन्हा हलवून घ्यावी. कढईवर झाकण ठेवून त्यात भरपूर पाणी घालावं आणि वाफेवर भाजी शिजवावी. ही भाजी भोगीच्या दिवशी केली जाते. या भाजीसोबत ज्वारीची तीळ घालून भाकरी केली जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.