Makar Sankranti : संक्रांतीला मानाची तर असतेच पण हिवाळ्यात आरोग्याला सुद्धा फायदा देते गूळपो‌ळी

संक्रात आली की, हमखास आठवण येते ती गूळपो‌ळीची
Makar Sankranti
Makar Sankrantiesakal
Updated on

Makar Sankranti : संक्रात आली की, हमखास आठवण येते ती गूळपो‌ळीची. चवीला स्वादिष्ट असणाऱ्या या पोळ्या तयार करण्यासाठी मात्र भरपूर कष्ट घ्यावे लागतात. थंडीच्या दिवसांत उष्ण पदार्थ खाल्ले पाहिजेत, त्यामूळे संक्रांत आली की आवर्जून गूळपो‌ळी करतात. त्याचीच ही रेसिपी...

Makar Sankranti
Heart Attack : हिवाळ्यात अंघोळ करताना 'ही' चूक करू नका नाहीतर येऊ शकतो हार्ट अटॅक

सारण:

चार वाट्या गूळ - व्यवस्थित बारीक चिरलेला

एक वाटी बेसन

अर्धी वाटी तेल

अर्धी वाटी खमंग भाजलेल्या तीळाचं कूट

दोन चमचे भाजलेली खसखस

जायफळ, वेलची स्वादासाठी

Makar Sankranti
Travel Tips : क्रूर प्राण्यांनी गजबलेलं बेट, जेवण सुद्धा हेलिकॉप्टरने पोहचवावं लागतं

पारीसाठी:

४ वाट्या गव्हाच मैदा

४ वाट्या कणीक

अर्धी वाटी बारीक रवा

१ वाटी तेल

चवीपुरतं मीठ

कणीक भिजवायला पाणी

पोळी लाटताना लावण्यासाठी तांदुळाचे पीठ

Makar Sankranti
Heart Health : निरोगी हृदयासाठी कसा असावा आहार ?

पाककृती:

१. तीळ कढईत घालून बारीक गॅसवर खमंग भाजून कूट तयार करा. खसखसही बारीक गॅसवरच भाजा. त्याच कढईत आता अर्धी वाटी तेल गरम करून त्यात बेसन चांगलं खमंग भाजा.

२. चिरलेला गूळ झाकणाच्या डब्यात ठेवून झाकण लावून कूकरमधे ठेवा. गॅस चालू करून कूकरच्या दोन शिट्या झाल्या की गॅस बंद करा.

३. कूकरचं प्रेशर पडलं की ताबडतोब डब्यातल्या गूळात भाजलेलं बेसन, तीळाचं कूट, खसखस मिसळा. आपल्या आवडीप्रमाणे जायफळ, वेलचीपावडर घाला. हे मिश्रण कोमट झालं की हाताने चांगलं मळून घ्या. हे पोळीच सारण तयार झाल.

Makar Sankranti
Makar Sankranti 2023: मकरसंक्रांतीला खण देण्याची परंपरा काय सांगते?

४. पारीसाठी कणीक, बारीक रवा आणि मैदा मिसळून घ्या. त्यात चवीपुरतं मीठ घालून अगदी कडकडीत गरम तेल घाला. चमच्याने ढवळत सगळ्या पीठाला ते गरम तेल लागेल असं पहा. मग लागेल तसं पाणी घालत आपण नेहमी पोळ्यासाठी कणीक भिजवतो तेवढी नरम कणीक भिजवून घ्या.

५. भिजवलेल्या कणकेचा लाडवाएवढा गोळा घेऊन त्याची पारी करा. त्यात गोळ्याच्या साधारण दुप्पट सारण भरून पारी बंद करून पोळी लाटा. पोळी लाटताना चिकटू नये म्हणून तांदूळाची पिठी भुरभुरवा.

६. चांगल्या तापलेल्या तव्यावर पोळी खमंग भाजा. ही पोळी एका बाजूने एकदाच भाजावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.