मकर संक्रांती अनेक राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते.
मकर संक्रांतीचा (Makar Sankranti) सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मकर संक्रांती अनेक राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते. मकर संक्रांतीचा सण दरवर्षी 14 जानेवारी रोजी साजरा केला जातो. असे मानले जाते की या दिवसात हिवाळा (Winter) संपतो आणि उन्हाळ्याची सुरूवात होते. मकर संक्रांतीच्या दिवशी अनेक प्रकारचे पदार्थ तयार केले जातात, परंतु खिचडी आणि तिळाचे लाडू (Til Ladoo) यांचे महत्त्व वेगळे मानले जाते.
गुळापासून बनवलेले तिळाचे लाडू (Til Ladoo) विशेषतः हिवाळ्यात मकर संक्रांती दिवशी बनवले जातात. तिळाचे लाडू बनवणे खूप सोपे आहे. या लाडूंमध्ये गुळाचा चांगला गुणधर्म आहे जो हिवाळ्यात थंडीपासून तुमचे रक्षण करण्यास देखील मदत करू शकतो. चला तर मग गुळ तिळाचे लाडू बनवण्याची सोपी रेसिपी पाहूयात.
साहित्य
- गूळ, तीळ, तूप, वेलची पावडर, बदाम, काजू
कृती
- हे लाडू बनवण्यासाठी प्रथम तुम्हाला तीळ कढईत भाजून घ्यावे लागतील.
- नंतर थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. गॅसवर कढई ठेवून त्यात तूप घालून गरम करा.
- यानंतर गूळ घालून पूर्णपणे वितळू द्या. गॅस मंद आचेवर करा.
- गूळ वितळल्यानंतर त्यात तीळ, वेलची पूड, बदाम आणि काजू घालून मिक्स करा. आता गॅस बंद करा.
- मिश्रण थोडं थंड झाल्यावर हाताने ग्रीस करून लाडू बनवून सर्व्ह करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.