कोल्हापूर: तुम्हाला जर घरच्या घरी रेस्टॉरंट सारखी क्रिस्पी फ्रेंच फ्राइज़ (crispy french fries)तयार करायचे आहे. असं तुम्ही विचार करत असाल तर तुम्हाला खूप छोट्या छोट्या ट्रिक्स (tricks)सांगणार आहोत .फ्रेंच फ्राइज़ हे सगळ्यांनाच माहिती आहे. फ्रेंच फ्राईज असं नाव जरी घेतलं तरी लहान मुलांनाच नाही तर मोठ्यांना सुद्धा तोंडाला पाणी सुटतं. तुम्हाला जर भूक लागली असेल आणि त्याला शांत करायचे असेल झटपट रेसिपी म्हणजे फ्रेंच फ्राईज..चहा मध्ये तडका लावण्यासाठी मसाल्याचा वापर करतात तसेच फ्रेंच फ्राइज़ भुक शमवण्यासाठी महत्वपूर्ण आहे. जेव्हा जेव्हा टेस्टी स्नॅक्सची आठवण येते तेव्हा आपल्याला रेस्टॉरंट आठवते. कारण रेस्टॉरंटमध्ये खूप क्रिस्पी फ्रेंच फ्राईज होतो. तुम्ही कधी ना कधी घरी फ्रेंच फ्राईज बनवला असेल तर तो इतका क्रिस्पी झाला नसेल. पण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत घरच्या घरी क्रिस्पी फ्रेंच प्राईज कसे बनवाल.(make-crispy-french-fries-at-home-Use-3-tricks-food-tips-marathi-news)
थंड पाण्यामध्ये डिप करा
तुम्ही जेव्हा फ्रेंच फ्राईज बनवता तेव्हा तो कट केल्यानंतर पटकन फ्राय करून घेता आणि यामुळेच तुमचे फ्रेंच फ्राईज कुरकुरीत आणि टेस्टी होत नाहीत. पण क्रिस्पी फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी खूप चांगली ट्रिक्स आहे ती म्हणजे त्याला थंड पाणी किंवा बर्फामध्ये कमीत कमी अर्धा तास भिजवून ठेवा. त्यानंतर त्याला फ्राय करा. त्याच पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाका आणि हे भांडे फ्रीजमध्ये ठेवून द्या. अर्ध्या तासानंतर कट झालेले फ्रेंच फ्राईज पाण्यातून बाहेर काढा. टिशू पेपर मध्ये त्याला ड्राय करून घ्या. आता कढईमध्ये तेल गरम करून ठेवून मध्यम आचेवर तळून घ्या. गोल्डन होईपर्यंत तळा. प्लेटमध्ये घ्या आणि चटणी सॉस सोबत सर्व करा.
थोडेसे उकडवून फ्रीजमध्ये ठेवून द्या
फ्रेंच फ्राईजला क्रिस्पी बनवण्यासाठी आणखीन एक प्रकार आहे. तो म्हणजे त्याला उकडून घ्या आणि फ्रीजमध्ये ठेवून द्या. यासाठी सगळ्यात पहिल्यांदा बटाट्याला फ्राईजच्या आकारानुसार कट करून घ्या. जेव्हा सगळे फ्रेंच फ्राईस कट होतील तेव्हा मोठ्या भांड्यांमध्ये पाणी टाकून उकळून घ्या. कट केलेले फ्रेंच फ्राईज त्यामध्ये सोडून द्या. उखलेल्या पाण्यातून फ्रेंच बाजूला काढून कोरडे करून घ्या. त्यानंतर सील बंद बॅगमध्ये घालून ते फ्रिजमध्ये दोन तासांसाठी ठेवून द्या.दोन तासानंतर फ्रेंच फ्राईज गरम तेलामध्ये फ्राय करून घ्या. अगदी रेस्टॉरंट सारखी क्रिस्पी होईल. लक्षात ठेवा कि गरम तेलात फ्रेंच सोडताना गॅस मोठा ठेवा आणि हळूहळू थोडासा मध्यम आचेवर करत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्या.
कॉर्नफ्लॉवर पिठाचा वापर करा
क्रिस्पी फ्रेंच बनवण्यासाठी जेव्हा तुम्ही फ्रेंच फ्राईज आकारात कट करतात तेव्हा ते डायरेक्ट न तळता त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचे पिठ वरून शिंपडा. यासाठी फ्रेंच फ्राईज कट केल्यानंतर त्याला काॅनफ्लॉवर, थोडे तांदळाचे पीठ घालून आणि मसाला टाकून मिक्स करून घ्या. तेलात तळत असताना एक एक पिस त्यामध्ये टाकून गोल्डन कलर येईपर्यत मंद आचेवर तळून घ्या .तयार झाल्यावर गरम गरम सर्व्ह करा.
या ट्रिक्सचा वापर करून तुम्ही घरच्या घरी रेस्टोरेंटसारखी क्रिस्पी आणि टेस्टी फ्रेंच फ्राईज बनवा. यामध्ये कमी तेलाचा वापर करू शकता. ज्याचा उपयोग आरोग्यासाठी नक्कीच फायदेमंद होईल. चला तर मग बनवा क्रिस्पी फ्रेंच फ्राइज़.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.