Recipe : पार्टीसाठी घरीच बनवा रेस्टॉरंट स्टाईल रेसिपी; तळलेले मसाला बटाटा

स्वयंपाकघरातील काही मसाल्यांचा वापर करून हा साधा नाश्ता काही मिनिटांत बनवता येतो.
 fried masala potato recipe
fried masala potato recipe
Updated on
Summary

स्वयंपाकघरातील काही मसाल्यांचा वापर करून हा साधा नाश्ता काही मिनिटांत बनवता येतो.

सध्या अधून मधून पावसाच्या सरी सुरु आहेत. या पावसाला जोर नसला तरी अनेकांना आवडणार रिमझिम पाऊस सुरु आहे. दरम्यान, या वातावरणात काही चटपटीत खाण्याचा आणि गरमागरम पदार्थांची चव येते. अशावेळी तुम्ही चहा, भजी, वडा अशा काही पदार्थांना आवर्जुन पंसती देता. दरम्यान, तुमची पावसाळ्याची संध्याकाळ अधिक आनंददायी बनवण्यासाठी कुरकुरीत नाश्ता शोधत असाल तर ही खास रेसिपी तुमच्यासाठी आहे. (fried masala potato recipe)

बटाटे आणि काही देसी मसाले, ताजी कोथिंबीर टाकून बनवलेला हा स्वादिष्ट, झटपट 5 मिनिटांत तयार होणारी नाश्ता रेसिपी तुम्ही ट्राय करुन पहा. स्वयंपाकघरातील काही मसाल्यांचा वापर करून हा साधा नाश्ता काही मिनिटांत बनवता येतो. या रेसिपीचा आस्वाद चहा किंवा कॉफीसोबत घेता येतो. जर तुम्ही अचानक पार्टी करण्याचा विचार करत असाल तर हा नाश्ता तुमच्यासाठी बेस्ट पर्याय आहे. बटाट्याच्या पाककृती बहुतेकांना आवडतात. त्यामुळे आज आपण जाणून घेणार आहोत की, तळलेला मसाला बटाटा कसा बनवावा?

 fried masala potato recipe
Personality Developement: निगेटिव्हिटी पासून दूर राहून 'असं' ओळखा तुमच्यातील Hidden Talent

तळलेला मसाला बटाटा बनवण्यासाठी साहित्य -

  • 200 ग्रॅम कातडीसह लहान बटाटे

  • 1 टीस्पून लाल तिखट

  • 2 मूठभर हिरवी धणे

  • 1 टीस्पून काळी मिरी

  • 2 चमचे लिंबाचा रस

  • 4 हिरव्या मिरच्या

  • आवश्यकतेनुसार मीठ

  • आवश्यकतेनुसार पाणी

  • 1 टीस्पून चाट मसाला

  • 1 टीस्पून वाळलेल्या कैरी पावडर

  • आवश्यकतेनुसार रिफाइंड तेल

तळलेला मसाला बटाटा कसा बनवावा कृती -

तळलेला मसाला बटाटा ही सोप्या रेसिपी बनवण्यासाठी प्रथम बटाटे धुवून बाजूला ठेवा. त्यानंतर एक कढई घ्या आणि कढईत तेल टाका. तेल पुरेसे गरम झाल्यानंतर त्यात लसणाच्या कळ्या आणि बटाटे टाका. बटाटे हलकेच तळून आणि भाजून घ्या. बटाटे तपकिरी झाल्यावर त्या मसाले, धणे, लिंबाचा रस आणि हिरव्या मिरच्या घाला. बटाटे तळून घ्या आणि सर्व्ह करा. तुम्हाला हवे असल्यास त्यावर चीज टाकूनही सर्व्ह करू शकता. मुलांना ही रेसिपी नक्कीच आवडेल.

 fried masala potato recipe
पलंग विकत घ्यायला लागली ८ वर्षे; स्टीव्ह जॉब्स व लॉरेन पॉवेल जॉब्स यांच्यातील गोष्टी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.