मिक्सरचा उपयोग न करता घरीच बनवा चिली फ्सेक्स आणि ऑरिगेनो

बाजारात मिळणारे ऑरिगेनो आणि चिली फ्लेक्स बरेच महाग असतात. ऑरिगेनो आणि चिली फ्लेक्स हे दोन्ही आपल्याला घरीही बनवता येतात
chilli flakes and oregano
chilli flakes and oreganochilli flakes and oregano
Updated on

औरंगाबाद: आपण नेहमी बाजारातून ऑरिगेनो आणि चिली फ्लेक्स (chilli flakes and oregano) विकत आणतो. बऱ्याचदा आपण पिज्जा किंवा बर्गरसोबत मिळालेले ऑरिगेनो आणि चिली फ्लेक्सचे पॅकेट संभाळून ठेवतो आणि नंतर त्याचा उपयोग इतर डिशेससोबत केला जातो. बाजारात मिळणारे ऑरिगेनो आणि चिली फ्लेक्स बरेच महाग असतात. ऑरिगेनो आणि चिली फ्लेक्स हे दोन्ही आपल्याला घरीही बनवता येतात (food article). चला तर मग जाणून घेऊया कशी करायची ऑरिगेनो आणि चिली फ्लेक्स...

चिली फ्लेक्स कशी बनवाल-

यासाठी ५० ग्रॅम वाळलेल्या लाल मिरच्या लागतील. हे तुम्ही मिक्सरचा उपयोग न करताही अगदी सहज बनवू शकता. या मिरच्या तुम्ही घरी एकदम कडक उन्हात वाळवून घ्या.

फक्त या ३ स्टेप करा-

१. मिरच्या तोडून त्यातील सगळ्या बीया काढा.

२. त्यातनंतर त्या मिरच्या एका पॉलिथीनमध्ये घालून क्रश करा.

३. त्यानंतर ते दोन्ही एकत्र करा.

फक्त एवढी कृती जरी केली तरी तुमची चिली फ्लेक्स तयार होऊन जाईल. ही मिक्सरचा उपयोग न करता केली जाऊ शकते.

घरीच ऑरिगेना कसं बनवाल-

घरी ऑरिगेना तयार करायचं असेल तर त्यासाठी एकाच वस्तूच गरज लागेल आणि ती म्हणजे अजवाइनची पाने. हे तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जातील. तसेच तुम्ही घरीच अजवाइनचे झाडही लावू शकाल.

साहित्य-

- अजवाइनची पाने

त्यानंतर फक्त तुम्हाला तीन स्टेप्स करायच्या आहेत.

१. पहिल्यांदा अजवाइनची पाने धुवून वाळवा.

२. तसेच ते तव्यावर गरम केल्यासही कोरडे होतील.

३. ज्यावेळेस ही पाने व्यवस्थित कोरडी होतील त्यावेळेस त्याचा चुरा करा आणि ते हातांनीच चुरा होतील. तेच तुमच्यासाठी घरगुती ऑरिगेनो असेल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.